बोगस कागदपत्रे दाखल करून पुनर्वसन जमिनी लाटण्याचा यशस्वी प्रयत्न करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करा! नागरिकांची मागणी(भाग १)

दौंड:आवाज लोकशाहीचा

शासकीय जमीन लुटण्यासाठी दौंड तालुक्यातील पुनर्वसन भूमाफियानी बोगस कागदपत्रे तयार करून दौंड तालुक्यातील तहसीलदार,प्रांत अधिकारी व जिल्हा वरिष्ठ अधिकाऱ्यांनाच फसवले ? याचा शोध घेऊन त्यांच्यावर शासकीय जमीन लुटण्याचे गुन्हे दाखल का?होत नाही ? यात काय गौड बंगाल आहे का? का शासकीय पगार घेऊन वरील माया मिळवण्यासाठी त्यांनी आपल्या शासकीय नोकरीची बेइमाई या दलालांसाठी केली का ? याचा शोध या प्रश्नाने घेणे गरजेचे बनले आहे.

दौंड मध्ये शासकीय कागदपत्रांची खाडाखोड करीत दौंड तालुक्यात पुनर्वसनाच्या जमिनी मिळवणारी टोळी आहे.याचा बुरखा दौंड तहसील विभागानेच मागील १५ वर्षा पूर्वी फाडला असून काहींच्या जमिनी परत सरकार जमा केल्या आणि काहीना आता पर्यंत सवलत का? दिली हे मोठे कोडे असून त्यांच्या कारभाराला शंकेने पाहण्या सारखेच आहे.

तालुक्यात जमिनी लाटण्यासाठी दलाल आणि त्यांच्या टोळीला राजकीय आश्रय देणारा आका यांच्या कारभाराचा भ्रष्ट स्वरूपाचा कॅन्सर झाला असल्याची चर्चा नागरिक करू लागले आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी की,बोगस कागदपत्रांच्या आधारे तालुक्यात २६१ खातेदारांनी जमिनी मिळवल्या आहेत.त्यांना या साठी कोणी मदत केली आणिं कोणाचा आशीर्वाद मिळाला हा शोध मोहिमेचा भाग असला तरी जमीन मिळवण्यासाठी ताबा पावती मध्ये खाडाखोड करणे,झालेल्या आदेश त्यात गट नंबरच बदलणे,पंचनाम्यात वेगळा आणि मागणी वेगळी अशा प्रकारची कागदपत्रे देणे काही ठिकाणी नाव काही ठिकाणी आडनाव बदलून मागणी केलेली आहे.

एवढ्यावरच ते थांबले नाहीत तहसीलदार यांच्या स्वाक्षरीला व्हायटनर लावून सहीच डुबलीकेट करण्याचे धाडस सुद्धा त्यांनी केलेले आहे.

त्यांच्या या  सर्व भानगडी तत्कालीन तलाठी जी.डी बंडगर,यु.बी गोसावी, एस.टी तिकुटे,एस.डी हिरतोड,व्ही.व्ही मगर,आर.यस पवार,पी.एस सुळ, एम.बी वाबळे,आर.बी मुलानी,एस.डी शेलार, बी.जी कदम,एस.एन जावळे,ए.वि ताकवले,के.ओ गिरगोसावी,एन.वाय गायकवाड, एस.एस खोमणे,एन.डी खोमणे,एस.आर कांबळे,एस.बी जाधव,एस.एस गायकवाड,जे.एच वाघ,बी.एस गोडसे यांनी आणि तत्कालीन मंडल अधिकारी व्ही.एन करे, डी.टी सरोदे ,म.अ सूर्यवंशी,एम जी घाडगे,आर.एस तांदळे,व्ही.एन जाधव,टी.आर काळे,पी.एन शिर्के,डी.एस धुमाळ,यु.एसशिंदे,बी.एन, निंबाळकर,ए.एन सावंत यांनी यादीच बनवून उघड केली आहे.

यादीत सुनील नथू शेडगे,सीताबाई चंद्र जाधव व जनाबाई संगीता दत्तात्रय पासलकर,सतीश शंकर साबळे,काळुबाई विष्णू साळेकर,भागुबाई रामभाऊ मरगळे,राधाबाई बाळा भोसले,अनिता दादा राजपुरे,भिका रामा पोळेकर,ताराबाई नथू निवंगुणे,माळाराम जोराजी काळे,लक्ष्मण दशरथ महानवर,शंकर कैलास कोळी,गजानन काशीराम देशपांडे,गणपत साधू पासलकर व बाई अंकुश दबडे,सदू राघू कोंडू,गणू मरगाळे,गोविंद कोंडीबा कोळेकर,वाघू भागू वाक्षे,रजनी नामदेव पासलकर,सुंदराबाई गोविंद कोळेकर,सुमन दिनकर पासलकर,गणू बाळा वाक्षे,वाघू भागू वाक्षे,रजनी नामदेव पासलकर,मारुती सखाराम पडवळ,किसन मारुती पडवळ,सखाराम बाळाजी कडू,रामचंद्र गणपत कडू,भागू राघू दबडे,चंद्रभागा दिलीप कडू,हिराबाई महादेव दिंडले,गणेश कोंडू शिंदे व शैला अशोक जिंकले,सीताबाई रामचंद्र शेडगे,उत्तम गणपत कडू,दिलीप मारुती कडू,पार्वती श्रीपती कडू,महेश कृष्णराव मारणे,प्रकाश नाथू दबडे,सखुबाई नातू दबडे,भगवान वाघू पवार,धोंडीबा भागू मरगळे व बाई बाबू मरगळे,गणपतराव अमृतराव पासलकर,हौसाबाई रामा हळदे,सोनू दाजी शेडगे,अलका कैलास दबडे,पारूबाई निवृत्ती कोळेकर,शकुंतला दत्तात्रेय वरघडे गऊबाई मारुती मोरे,शिवाजी मारुती मोरे,सुदाम मारुती मोरे,सीताबाई सखाराम कोळेकर,फुलाबाई हिरामण वरखडे,रामजी बाबू दवडे,राहीबाई दगडू मोरे,लक्ष्मण बाळाजी पासलकर,दत्तात्रय अनंता पासलकर,भिकाजी बाळाजी पासलकर,सोनू ज्ञानू जाधव,निर्मला अरुण शेळके,धावून दबडे,सुकाबाई दामोदर मोरे,सिंधुबाई न्यानोबा मोरे,राघू रामजी शेडगे,जनाबाई लक्ष्मण मोरे,रामचंद्र तुकाराम शेंडगे,श्रीपती भाऊ पासलकर,मारुती व संपत पार्वती पासलकर,दामोदर सखाराम पंडित,रंजना सिदु कानगुडे,नारायण बाळकृष्ण सास्ते,सुंदराबाई राजू मारणे,मारुती धोंडू भोसले,लक्ष्मी हनवती हनमघर,तानाबाई गणपत कड,वाघोजी बाळा निढाळकर,सुभाष वाघोजी निढाळकर,गणपत धोंडीबा कडू,धोंडीबा कोंडीबा जगदाळे,मंगल ज्ञानोबा शिंदे,सुशीला बबन कोडे,बाबू दौलती कडू,गोविंद बाबू कडू,महिपती बिट्टू कडू,दगडाबाई दगडू धोणे,हिराबाई दत्तात्रेय पंडित,अशोक महादेव दिंडले,महादू गोविंद नाकते,छबाबाई शामराव वरघडे,पांडुरंग भगवान पासलकर व इतर नरेश नारायण कोळेकर,रामचंद्र नारायण पासलकर,लक्ष्मण रामजी पासलकर,संदीप लक्ष्मण पासलकर,सावित्रीबाई संजय पासलकर,सुनील दिनकर पासलकर,गिताबाई दिनकर पासलकर,दशरथ महिपती शिंदे आदीं सह अजून काही नावे बाकी आहेत.

तालुक्यात यांच्या नावाने यादी तयार करून जवळपास १५ वर्ष उलटली आहे.दरम्यानच्या काळात या सर्वांनी बोगस कागदपत्रांद्वारे किती जमीन मिळवलेली होती हे शोध मोहीम आवाज लोकशाहीचा माध्यमातून सुरू असून लवकरच ती प्रकाशित केली जाइल.

पुनर्वसन घोटाळ्यातील हा महत्वाचा पुरावा म्हणल्यास चुकीचे ठरणार नाही. बोगस कागदपत्रे तयार करून जमीन पदरात पाडणाऱ्या खातेदारांवरती सरकारची फसवणूक केली म्हणून गुन्हे दाखल करावे अशा स्वरूपाची मागणी आता नागरिकां मधून जोर धरू लागलेली आहे.