दौंड:आवाज लोकशाहीचा
दौंड पुनर्वसन जमिनीच्या महत्वाच्या नोंदींची शासकीय कागदपत्रे गायब झालेली आहेत याची पालेमुळे दलालांच्या घरात आणि चारचाकी गाडीच्या डिक्कीत आणि कुणाच्या ऑफिस पर्यंत गेली आहेत.
केडगाव दापोडी पिंपळगाव यवत आणि दौंड मधील काही भामट्यांनी त्याचा फायदा घेण्यासाठी पुनर्वसन विभागातील भ्रष्ट कारभार करणारे कर्मचारी आणि तालुक्यातील काही तलाठी मंडल अधिकारी यांच्या हातावर चिरीमिरी दिल्याने त्यांना शक्य झालेले आहे.
दौंड मध्ये स्टॅम्प विक्रेत्यांची कसून झाडा झडती घेतल्यास अनेक भानगडी बाहेर येतील अशी माहिती त्याच्याच एका जवळच्या व्यक्तीने दिली आहे.या व्यक्तीला त्याने जमीन व्यवहारात फसवल्याने त्याने ही माहिती दिली आहे त्याला राजकीय आका चा आशीर्वाद असल्याने विरोध करता येत नाही आणि करण्याचा प्रयत्न केल्यास काहीच परिणाम होत नाही अशी माहिती सुद्धा त्याने दिली आहे.
दापोडी केडगाव यवत पिंपळगाव नानगाव कानगाव पारगाव वरवंड गावातील सर्व राजकारी दलाल असून केडगावच्या दलाला ची भागीदारी पत्रकार आणि राजकारण्याची असल्याने त्याचा भलताच रुबाब वाढलेला आहे.
वातानुकूल चारचाकीतून जमिनीच्या कामांसाठी दौंड पुणे घिरट्या घालणारे दलाल शासनाच्या अनेक कागदपत्रे घोटाळे करण्यात माहेर बनलेले असून त्यांनी काही अधिकारी आणि कर्मचारी लाभ देऊन लाचार केलेले आहेत.
परिणाम बोगस कागदपत्रांच्या आधारे बोगस खातेदार नावांनी जमिनी मिळवण्याचे कामकाज कॉलर टाईट करून घेतलेले आहे.सद्या दौंड मध्ये अशा बोगस जमिनीची यादी २०१३ मध्ये तत्कालीन दौंड/पुरंदर प्रांत यांनी जवळपास ७०० हून अधिक एकराच्या पुढील तयार याच भानगडी पाहून केलेली होती.सद्या ती सुद्धा संपली आहे तिचे वाटप केले गेले आहे हा एक शोध मोहिमेचा भाग होणार आहे.
बोगस कागदपत्रांच्या आधारे जमीन मिळवलेल्या खातेदारांना प्रशासनाने शासन का ? केले नाही
दौंड तालुक्यात बोगस कागदपत्रे दाखल केलेल्या आणि त्यातून जमिनी मिळवलेल्या खातेदारांना कोणतीच कारवाई केल्याविना शासनाने सोडून कसे दिले हा प्रश्न प्रशासनाच्या कामकाजावर शंका उपस्थिती करणारा आहे.
जमीन मिळवताना खातेदाराला सरकार कोणती कागदपत्रे द्यावी लागता त्यात सत्य प्रतिज्ञापत्र सुध्दा असते या मध्ये चुकीची माहीत दिल्यास कलम या प्रमाणे माझ्यावर कारवाई केली जाते असे स्पष्ट नमूद केले असताना त्यांना मोकाट कसे सोडले हा एक प्रश्न आहे.
याचा विचार केल्यास या पाठीमागे अधिकारी कर्मचारी यांनी आर्थिक तडजोड केल्याचा वास येणे साहजिकच आहे.आणि त्यासाठी त्यांच्या रोज संपर्कात असणारे दलाल यांची महत्वाची कामगिरी त्यांनी या निमित्ताने बजावलेली आहे असे समजल्यास चुकीचे ठरणार नाही.
दौंड तालुक्यात केडगाव दापोडी वरवंड यवत नानगाव खामगाव कानगाव या भागात काही दलालांचा अशा जमिनी मिळवण्यासाठी धुमाकूळ चालू असून दौंड शहरांमध्ये पुण्यावरून एक दलाल आणि त्याला सामील असणारी दोन शहरातील टोळीचे मोठ साम्राज्य पसरलेले आहे.
या साम्राज्याला शासकीय कामात मदत करणार त्या विक्रेता आणि दौंड नगरपालिकेचा एक सेवानिवृत्त स्वतःला अधिकारी समजणारा कामगार यांनी गोरगरिबांच्या जमिनी कवडीमोल स्वरूपाने कागदपत्राच्या अनुषंगाने मिळवले असून मोठी माया कमावलेली आहे.
केडगाव पारगाव वरवंड कानगाव नानगाव आणि यवत या ठिकाणचे दलाल हे स्वतःला मान्यवर समजतात आणि राजकीय आशीर्वादाचे सुभेदार समजून काम करतात याचा विपरीत परिणाम प्रशासनावर होत असल्याने अधिकारी वर्ग यांच्यावर त्यांचा दाब राहतो,त्यांच्या कागदपत्रांना तत्काळ गती मिळाली नसल्यास अधिकाऱ्यांवर राजकीय प्रेशर आणला जातो अशा स्वरूपाचा हा खेळ दौंड तालुक्यातील गेली काही वर्षे चालू आहे.
जमिनीच्या भ्रष्टाचारातला सर्वात मोठा कारभार दौंड मध्ये झालेला आहे.याचा तपास प्रशासनाने लवकर करावा अन्यथा जनआंदोलन करण्याचा इशा तालुक्यातील एका मोठ्या नेत्याने दिलेला आहे.त्यासाठी लागणाऱ्या ऊचित कागदपत्राची जुळवा जुळव त्यांनी सुरू केलेली आहे.लवकरच राज्याच्या उन्हाळी अधिवेशनामध्ये या सर्व जमिनी बाबत प्रश्न उपस्थित करण्यासाठी सरकारच्या विरोधातील काही आमदारांची ते मदत घेणार आहेत.



