दौंड:आवाज लोकशाहीचा
दौंड नगरपरिषदेत जवळपास ५५ लाख रुपये अधिक भ्रष्टाचार करणाऱ्या सहाय्यक अभियंता याने पोलिसात त्याच्या विरोधात तक्रार दाखल केल्यावर सात वर्ष पालिका प्रशासनाच्या नाकावर टिच्चून सेवा केली आणि त्यांच्या कडून सेवा निवृत्तीचे शिष्टाचार करून सुद्धा घेतलां आहे
.ज्याला भ्रष्ट कारभारात पोलिसात गुन्हा दाखल करून त्याच्यावर खटला चालवायचा होता त्याला पालिकेने सेवानिवृत्ती सोहळ्यात हार तुरे देऊन त्याचा सन्मान केला आहे.हा प्रकार मोठा गंभीर असताना पालिका प्रशासन आणि तत्कालीन नगराध्यक्ष,नगरसेवक यांनी सर्व प्रकार मुकाट्याने कसा पाहिला हा खरा प्रश्न महत्वाचा आहे.
दौंड शहरातील असंख्य बांधकामांच्या कागदपत्रात गोलमाल करीत बदल्यात माय जमवण्यात माहीर असलेल्या सहाय्यक अभियंता यांच्या वर तक्रार दिलेल्या पत्राबाबत कोणताच निर्णय का ? घेतला नाही ही शंका सद्या मोठे वादळ उभारत आहे.
दौंड तालुक्यात पुनर्वसन जमिनीच्या घोटाळ्यात अप्रत्यक्ष त्याने बांधकाम परवानगी देताना मोठ्या चुका केल्या असून बदल्यात त्याने मिळकती मिळविल्याची मोठी चर्चा आहे.
प्रत्यक्षात आपल्या नावावर कागदपत्रे काहीच नाही असे ठामपणा सांगणाऱ्या या व्यक्तीने आर्थिक लाभ किती उठवला या बाबत शहरातील अनेक नागरिक डोळे बंद करून सांगू शकतात अशी परिस्थिती आहे.
एका प्रसिद्ध व्यापाऱ्याने अश्याच घोटाळ्याच्या जागेवर संकुल उभे करताना त्यातील अनेक भानगडी घडल्या आणि त्या संकुल बाबत तत्कालीन इरिगेशन कार्यालयांच्या अधिकाऱ्यांनी सुधा या विषय अंतर्गत तक्रार केलेली आहे.
दौंड शहरात पुनर्वसन जमिनीच्या घोटाळ्याची मोठी टोळी असून तिच्या साठी अत्यंत विश्वाची भूमिका एकेकाळचा कपड्याच्या दुकानात काम करणारा स्टॅम्प विक्रेता करीत असल्याने त्याने सुधा या वाहत्या गंगेत आर्थिक भरभराट व्हावी म्हणून आपले हात ओले करून घेऊन आज एक बांधकाम व्यावसायिक भूखंड विक्रेता म्हणून नाव कमवीत आहे.
धरणाच्या निर्मिती साठी गोरगरिबांच्या जमिनी गेल्या म्हणून दौंड तालुक्याबरोबर हवेली ,इंदापूर परिसरात त्यांना जमिनी दिल्या गेल्या त्यांना पुनर्वसन नावाने संबोधले गेला आहे..
हा पुनर्वसन चा जमिनीचा महा घोटाळा येथे सुरू झाला आहे .खऱ्या अर्थाने ग्रामीण भागामध्ये याची पाळीमुळे पोचली असती तरी मोजकेच दलाल या घोटाळ्याचे प्रमुख सूत्रधार म्हणून गणले जातात आणि यातील एक महत्त्वाची टोळी दौल शहरांमध्ये काम करते आहे यामध्ये तो स्टॅम्प्लेंडर शहरातील एक वाल्मीक कराड, त्याचा आका, जमीन विक्रीचा दलाल, आणि बांधकाम व्यवसाय करणारे त्यांची टोळी अतिशय प्रामाणिकपणाने काम करीत असून त्याचा परिणाम त्यांच्या आर्थिक प्रगतीवर झाला असला तरी त्यांच्या जमिनी त्यांनी खोट्या कागदपत्राच्या आधारे लुटल्या बळकवल्या अशा गोरगरिबांच्या आर्थिक तसेच मानसिक परिस्थितीवर फार मोठ्या प्रमाणात झालेला आहे.
याची सखोल चौकशी व्हावी आणि चौकशीतून सत्य बाहेर यावं शासनाला फसवणाऱ्या या ठग टोळीला योग्य त्या शासनाच्या कायद्यानुसार सजा व्हावी अशा स्वरूपाची मागणी आता मोठ्या प्रमाणात होत आहे.
…………… हे वाचा……………
पुनर्वसन नावाखाली शहरातील प्रतिष्ठित महिला उभी करून जमिनीचा विक्री कागद केला गेला असून ती उभी केलेली महिला कोण याचा तपास प्रमाणिक केल्यास या प्रकरणात जवळपास ९ लोकांची टोळी उघड होऊ शकते अशी मोठी चर्चा वाढलेली आहे .या घोटाळेबाज जमिनीची विक्री श्रीगोंदा तालुक्यातील काही प्रतिष्ठित मंडळींनी केलेली असून सध्या त्या जमिनीत मोठा बांधकाम व्यवसायी उभारण्याची त्यांनी तयारी केली आहे असे ही बोलले जात आहे



