दौंड:आवाज लोकशाहीचा
महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज आणि महाराजांच्या तत्कालीन शिलेदार विरबाजी पासलकर,तान्हाजी मालुसरे,शेलार मामा,येसाजी कंक यांचा वारसा सांगणाऱ्या ना आणि त्यांच्या जातीचा अभिमान असलेल्या ना नक्की झालं तरी काय?हा प्रश्न तालुक्यात पुनर्वसन जमिनी लुटणाऱ्या टोळीकडे पाहून निर्माण होत आहे.
या टोळीत बऱ्याच लोकांची संख्या आम्ही वारस आहोत या हवेत वावरताना लोकानी त्यांना पाहिलेले आहे त्यांनी पुनर्वसन गोरगरिबांच्या जमिनी खोट्या कागद पत्राद्वारे सरकार कडून मिळवायच्या आणि त्यांचा विकून पैसा करायचा यातून स्वतःचा आर्थिक स्रोत वाढवायचा धंदा सुरू केलेला आहे.ज्यांच्या नावांनी जमिनी मिळवल्या त्यांच्या परिवाराला दगा फटका करायचा ही बाब आमचे रयतेचे राजे आणि त्यांच्या शूर सरदार सुभेदारांनी केले नाही.मात्र सध्या त्यांची नावे घेऊन छाती काढून राज्यभर तालुकाभर मिरवतात त्यातील काही मोजक्यांनी मोठा धुमाकूळ घातला आहे.
सविस्तर माहिती अशी की विरबाजी पासलकर धरणग्रस्त नावाने राज्यातील पुणे जिल्ह्यात धरणासाठी काही गावे पुणे शहराच्या दक्षिण भागात डोंगरदऱ्यात असलेली उठवली त्यांच्या जमिनी ताब्यात घेतल्या आणि पुनर्वसन करण्यासाठी त्यांना हवेली दौंड इंदापूर तालुक्यात काही जमिनी ताब्यात घेऊन वाटप करण्याचा यशस्वी पर्यंत केला आहे.यात ज्यांच्या नावाने धरणग्रस्त म्हणून जमिनी ताब्यात घेतल्या त्या तत्कालीन छत्रपती शिवाजी महाराजांची शूर सरदार वीरबाजी पासलकर त्यांच्या इतिहासाची कीर्ती गेली अनेक शतक जिवंत आहे..
वाचनारांच्या अंगामध्ये त्यांच्या शौर्याचे रक्त सळसळ करते मात्र आता त्यांच्या नावाने काम करणारी काही २१ व्या शतकातील पिढी दौंड तालुक्यामध्ये पुनर्वसन जमिनीच्या खरेदी विक्रीच्या व्यवहारांमध्ये मोठ्या प्रमाणात उतरलेली आहे.सर्वच समाजसेवक आहेत असं नाही काहींनी समाजासाठी उत्तम रीत्या काम केलेला आहे आणि करीत सुद्धा आहे.पण काहींनी आपल्याच परिसरातील त्यांनी समाजाच्या भावकीच्या आणि गावकीच्या तालुक्यात पुनर्वशीत मिळालेल्या जमिनी बाबत खरेदी विक्रीचा व्यवसाय सुरू केलेला आहे.
व्यवसायाच्या संदर्भामध्ये कोणी कोणता करावा याबाबत बंधन नसत मात्र व्यवसाय कसा करावा यासाठी नागरिकांचे लक्ष त्यांच्या व्यवसायाकडे असते सध्या तालुक्यात या पुनर्वशीत झालेल्या काही भादरांनी त्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा सांगणारे असतील तानाजी मालुसरे यांच्या नावाचा वारसा सांगणारे असतील वीर बाजी पासलकर यांचे वारस म्हणून वागणारे आहेत.
शूरवीरांचे वारसे म्हणून वागणारे आहेत मात्र पुनर्वसन जमिनी सरकारकडून मिळवणे त्यासाठी जमेल त्या भानगडी करणे भानगडी दाबण्यासाठी राजकारणाची मदत घेणे या मदतीने जमिनीचा विक्री व्यवसाय करणे हे मोठं पाप करीत आहेत .
परिणामी यामध्ये असंख्य पुनर्वासीत समाजातील काही कुटुंब उध्वस्त झालेली आहे कोणी आत्महत्या केली कोण आत्महत्याच्या वाटेवर आहे.कोन घरी बसून माझी फसवणूक केली म्हणून या सर्वांच्या नावाने लाखोली वाद हातापायाची बोटे मोडत बसली आहेत
सर्व या व्यवसायातील नालायक आहेत असं नाही पण काहींनी सीमा ओलांडलेली आहे आणि हे आता सामाजिक सलोखा आणि पूर्वजांच्या इतिहासाचे पोवाडे जाताना कधीतरी एकत्रित दिसतात हा जमणारा समूह या महापुरुषांना सगळाच बदनाम करतो असं नाही पण यातले काही आता ठग झालेले आहेत.
लोकांना फसवून आपली प्रगती करणे हा त्यांचा धंदा बनलेला आहे.याचा विपरीत परिणाम छत्रपती शिवाजी महाराजांचे आणि त्यांच्या मावळ्यांचे विचार जपणारे आणि त्या विचारांवर आपले जीवन व्यथित करणारे बोटावर मोजण्या इतपत आहेत .अन्यथा बऱ्या पैकी पुनर्वसन जमीन विक्री दलालामुळे बदनाम झालेले आहेत.
राजांनी शेतकऱ्यांच्या शेतीला जपण्यासाठी त्यांच्या राज्य कारभारामध्ये शेतकऱ्याची परिस्थिती पाहून त्याला आर्थिक मदत केली यामध्ये बैल जोडी दिली नांगर दिला आणि आपल्या सैन्यांना शेतकऱ्यांच्या हितासाठी कठोर आदेश देताना म्हणाले माझ्या शेतकऱ्याच्या भाजीच्या देठालाही कोणाचा हात लागल्यास हात कलम करून टाकेल त्या छत्रपतींच्या इतिहासाची आज दौंड तालुक्यामध्ये अशा दलालांच्या कारभाराने वाईट दिवस दिसू लागले आहेत खऱ्या अर्थाने सखोल चौकशी केल्यास त्यांचा वसा आणि वारसा यांनी सांभाळन्या पेक्षा पायदळी तुडवला म्हणता येईल
गोरगरीब शेतकऱ्यांच्या जमिनीची आपली स्वतःची आर्थिक भरभराट करण्यासाठी फसवणूक होते आणि ते सर्व शेतकरी पुनर्वशीत आहेत ज्यांनी आपली शेती या पुणे जिल्ह्याच्या पिण्याच्या पाण्याची तहान भागावी म्हणून धरणासाठी दिलेले आहे.त्यांचा त्यांनी फसवल आहे असे दिसून येईल,
दौंड तालुक्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त या गोष्टीची आठवण येऊ लागली असून वीर बाजी पासलकर नावाच्या योद्धाने इतिहासामध्ये आपली ओळख शौर्याने केली असताना त्यांचे काही वारस हे गोरगरिबाच्या मिळालेल्या जमिनी जमेल त्या कागदपत्रांची गडबड करीत विक्री करून स्वतःचे भले करण्यासाठी आदबत आहेत
इतिहासात विरबाजी पासलकरांनी गोरगरिबांच्या अन्यायाला दूर करण्यासाठी आपला रक्ताचे पाणी केलं ते धारातीर्थी पडले असा त्यांचा इतिहास असताना त्यांचे काही वारस सांगणारे महाठग या तालुक्यात गोरगरिबांच्या जमिनीचे दलाल झालेले दिसून येत आहे सर्वच यामध्ये आहेत असं नाही तर जे पण आहेत त्यांनी आता प्रचंड धुमाकूळ घातलेला आहे.
इतिहासाच्या महापुरुषाची राजा शिवछत्रपतींची आज जयंती आहे आणि छत्रपतींचा इतिहास म्हटलं हजारो वीर मावळ्यांचा इतिहास जिवंत होतो या सर्व मावळ्यांनी आणि शिवाजी महाराजांनी रयतेचे साम्राज्य निर्माण केलं रयत सुखी व्हावी सर्व संपन्न व्हावी म्हणून स्वतःचा इतिहास निर्माण करून ठेवला.असताना त्यांच्या दौंड तालुक्यात स्वतःला समाजाचे प्रतिष्ठित समजणाऱ्यांनी मोठा घोटाळा चालवलेला आहे
शिवजयंतीनिमित्त या सर्वांना सुदबुद्धी मिळावी असे म्हणल्यास वावगे ठरणार नसली तरी पुनर्वसन जमिनीच्या सर्व रेकॉर्ड हा अतिशय प्रामाणिक पुणे तपासला पाहिजे आणि जे खर आहे ते नागरिकांसमोर आलं पाहिजे तरच छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या शूरवीर यांचा इतिहास हा काही भामट्यांसाठी प्रेरणादायी ठरेल अन्यथा छत्रपतींच्या साम्राज्यामध्ये काही गद्दार मावळे सुद्धा होते त्या मावळातील हे सर्व परत एकदा पुढे आलेत की काय असा प्रश्न निर्माण झाल्या शिवाय राहणार नाही.
हजारो एकर जमिनी या तालुक्यात पुनर्वसित नागरिकांसाठी काबीज केल्या होत्या त्या हजारो एकर जमिनीमध्ये आता हजारो करोड रुपयांचे घोटाळे निर्माण झालेले आहेत या सर्व घोटाळ्यांना उघड करा अशा स्वरूपाची मागणी आज जोर धरत आहे.
दौंड शहरालगत अशाच पुनर्वसन जमिनीचे खोटे दस्तऐवज करून कोणी स्टॅम्प विक्रेता कोणी नगर पालिकेतील काम करणारा व्यक्ती स्वतःला नगरसेवक म्हणून समजणारे कोण तर कोणी व्यापार करणारे यामध्ये आर्थिक दृष्ट्या सक्षम झालेले असले तरी या सर्वांच्याकडून अनेक कुटुंब प्रचंड त्रस्त झालेले आहे या सर्व कुटुंबांना न्याय मिळण्यासाठी पुनर्वसन जमिनीच्या व्यवहारांच्या आत्तापर्यंत झालेल्या सर्व चौकश्या झाल्या पाहिजेत अशा स्वरूपाची मागणी होऊ लागली आहे.



