बीड मधील वाल्मीक.कराडचे पुढेच महाठग दौंड तालुक्यात निघतील..फक्त पुनर्वसन जमिनीचा प्रामाणिक तपास करा!

दौंड:आवाज लोकशाहीचा

दौंड तालुका पुनर्वसन जमिनीच्या घोटाळे बाजाचा कारभार महाभयंकर भ्रष्ट झालेला असल्याने त्यातून कमावलेल्या माया मधून दलाल आणि टोळी गब्बर झालेली आहेत.

स्टॅम्प विक्रेत्यांचा बिल्डर झाला असून सेवा निवृत सहाय्यक अभियंत्याने त्याच्या मदतीने आपली पोळी भाजून घेतली आहे.या दोघांना संधीचे सोने करायचीं संधी पुण्याहून येणाऱ्या दलालांनी आणि त्याला राजकीय पाठबळ देणाऱ्या आका यांच्याकडून मिळाली आहे.परिणाम मात्र या टोळीची भरभराट झालेली असून गरीब बिचारे मोठ्या आर्थिक मानसिक संकटाचे बळी झाले आहेत.

सद्या यांच्यापैकी काहींनी जातीय समीकरण बनवून स्वतःला वाचवण्यासाठी प्रयत्न सुरू केलेले आहेत
एका नेत्यांची त्यांनी मदत घेण्यासाठी दोन वेळा बैठक घेतल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे.भ्रष्ट कारभार करून माया जमा करून गोर गरिबांचा तळतळाट घेणाऱ्या या ठग कंपनीने .तो भ्रष्ट कारभार झाकण्यासाठी समाजाचा नवा फंडा राबवण्याचा  प्रयोग या निमित्ताने त्यांनी सुरू केला आहे.

कापड दुकानात काम करणाऱ्याने स्टॅम्प विकण्याची सुरवात केल्यावर त्याने सध्या मिळवलेल्या कमाईची सखोल चौकशी केल्यास तेलगी घोटाळ्यातील स्टॅम्प याने विकले की काय अशी शंका अनेकाना येईल मात्र त्याने या विषयाला हात न लावता पुनर्वसन जमीन दलाल आणि टोळीशी प्रामाणिक पना दाखवला त्यांची अनेक बोगस खरेदी विक्री व्यवहारात लक्ष दिले आणि बदल्यात माया कमावली आहे.असे स्पष्ट होऊ शकते

दौंड शहरात आणि लगतच्या गोपाळवाडी,सोनवडी, लिंगाळी, परिसरात भूखंड विक्रीचा व्यवसाय करीत आहे.सेवानिवृत नगर पालिकेतील अभियंता याने या टोळीच्या बांधकाम व्यवसायाला नगरपालिकेची परवानगी द्यायची आणि त्याच्या साठी मोबदला म्हणून कुठे भूखंड कुठे सदनिका कुठे व्यापारी संकुलन घेतले आहेत.अत्यंत डोक्याची चलाखी या व्यवसायात त्याने वापरली असून अनेक मिळकती नातेवाईक मित्र आणि काही बांधकाम व्यवसायिक यांच्या नावांवर करून घेतल्या आहेत.

शहरात अनेक बांधकामे यांच्या सहीने मंजूर झालेली असून मंजुरी साठी लागणारी कागदपत्रे मध्ये त्रुटी आणि चुका आहेत.त्यांच्या या कृत्यांनी दौंड नगरपालिकेचा मोठ आर्थिक तोटा झालेला आहे आणि यांची मिळकत वाढलेली आही ह्या आपल्या भानगडी उघड होऊ नये त्यातून चौकशी होवून एखादी बला पाठीमागे लागू नये म्हणून  शहरातील एका  नेत्याला विनवणी करू लागले आहेत.

  शहरातील या टोळीचा जेवढा त्रास आहे तेवढाच त्रास वरवंड केडगाव कानगाव पिंपळगाव पारगाव यवत नानगाव मधील काही भामट्यांनी पुनर्वसन जमिनीवर डोळा ठेवून उलट सुलट कारभार केलेले आहेत.राजकीय फायदा घेऊन त्यांच्या या भ्रष्ट कारभारावर पडदा टाकण्याचे काम झाले आहे.

केडगाव परिसरात असलेली एका भामट्याने मोठा घोटाळा केला असून त्याने आपली पाठराखण व्हावी म्हणून एका मोठ्या राजकीय आक्काच भागीदार म्हणून घेतल्याची चर्चा आहे.यांच्या कारभाराने आणि वर्तनाने अनेक गरीब कुटुंबे आर्थिक मानसिक त्रासाचे बळी ठरेल असून काहीना आत्महत्या काहींचा मानसिक रुग्ण होऊन मृत्यू सुधा झालेला आहे..

नागरिकांचा मृत्यू होतो तेव्हा प्रशासन काय करते?

पुनर्वसन जमिनी घोटाळा या प्रकरणाने नागरिकांचा मृत्यू होतो तेव्हा प्रशासन काय करते? अशी चर्चा पुनर्वसन जमिनी प्रकरणात दलालांनी दिलेल्या धमक्या आणि त्या नागरिकांवर केलेली दहशत हुकूमशाही झालेले नागरिक चर्चा करीत आहे तर जिल्हा कलेक्टर आणि राज्य सरकारने या प्रकरणात लक्ष घालून पुनर्वसन जमिनीचा चौकशी करावी व जमीन प्रकरणात घोटाळा झालेल्या दलालांना धडा शिकवावा आणि त्यांच्यावर कारवाई कारवाई अशी ही मागणी होऊ लागली आहे..

विशेष महत्वाचे वाचा

दौंड तालुक्यातील पुनर्वसन जमिनी वाटपाची सखोल चौकशी केल्यास मोठा घोटाळा उघड होऊ शकतो त्यात काही बीड मध्ये गाजलेले वाल्मिकी कराड त्याचा आकां आणि त्यांची टोळी सारखी दौंड तालुक्यात टोळी उघड होईल.

बीड पेक्षा सुध्दा भयानक स्टोरी दौंड तालुक्यातील राज्याला समजेल मात्र यात हवा तो सरकारी प्रामाणिक तपासणारे अधिकारी