
दौंड:आवाज लोकशाहीचा
एका बाजूला बोगस पुनर्वसन जमिनीची लाटली म्हणून दौंड पुरंदर तत्कालीन प्रांत अधिकाऱ्याने ७०० एकर अधिक जमीन ताब्यात घेतली आणि ती सध्या सर्व जमीन परत वाटप करण्यात आलेली आहे हा प्रकार दलाल एजंट आणि अधिकारी या तिघांच्या संगनमताने झाला आहे अशा स्वरूपाची शंका नागरिक व्यक्त करीत आहेत.
दौंड तालुक्यात पुनर्वसन जमिनीच्या देवाण घेवाण व्यवहारामध्ये काही पुनर्वसनाचेच दलाल निर्माण झाले असून या दलालांची तालुक्यामध्ये अडचण होऊ नये म्हणून त्यांनी काही राजकारणी व काही पत्रकारांनी शासनाचे अधिकारी यांची मदत घेतलेली आहे.
सरकारच्या ताब्यात असलेली ७०० अधिक एकर ची जमीन सध्या परत वाटप केल्याने या जमिनीची वाटप कोणाला करण्यात आली त्या सर्व खातेदारांची कसून चौकशी झाल्यास या पैकी कोणीतरी सापडेल असा आशावाद सुधा नागरिकांकडून होऊ लागला आहे.
दौंड तालुक्यात दलालांचा मोठा धुमाकूळ सुरू असून एकट्या मलठण मध्ये दीडशे एकर अधिक जमिनी बोगस वाटप झाल्याची नोंद सन – २०१३,१४ व १५ मध्ये तत्कालीन उपविभागीय अधिकारी सासवड आणि दौंड यांनी सरकार जमा करून घेतलेली आहे.सध्या ही जमीन गायब असून अनिता दादा राजपुरे,बेका रामा पाळेकर,ताराबाई नथू निवंगुणे,मालाराम जोराजी काळे,लक्ष्मण दशरथ महानवर,शंकर कैलास कोळी,गजानन काशिनाथ देशपांडे,विठ्ठल अंबादास जगताप,सीताबाई चंदर जाधव, सतीश शंकर साबळे,देवराम गोविंद कदम यांनी जवळपास ३० ते ३५ हेक्टर बोगस जमीन मिळवलेली आहे..
सन- २०१३ मध्ये सरकार जमा झालेली असली तरी त्यांना वाटप कधी झालेली होती याची माहिती पुनर्वसन विभाग लपवीत आहे तसेच याचा खरा तपास झाल्यास याच विभागातल्या काही अधिकारी आणि त्यांचे काही कर्मचारी याचा भाग निघतील ! जमिनीचे बोगस वाटप झाल्याचे त्यांच्या लक्षात आले आणि जमिनी ताब्यात घेतल्या आहेत मात्र दोषींवर गुन्हे दाखला का? केले नाहीत हा मोठा प्रश्न आहे.
सरकारच्या ताब्यात असलेल्या या जमिनी खिरापत असल्या-सारख्या वाटप केलेल्या दिसून येत आहेत.याचा खरा फायदा दलाला आणि त्यांच्या टोळीला झाला आणि तोटे आणि त्रास मात्र गरीब कुटुंबांना झाला आहे..
> *विशेष वाचा*
सरकारी खोटे दस्तऐवज करणे चुकीची कागदपत्र दाखल करणे त्याच्यावरती लाभ घेणे आणि सरकारची फसवणूक करणे आदी विषयाने सरकारकडून संबंधित लोकांवरती गंभीर गुन्हे दाखल करण्याचे गरजेचे होते.
मात्र राजकीय आशीर्वादाने पीडित असलेल्या या टोळक्यातला प्रशासनाची कायम मदत झालेली आहे आणि याचा विपरीत परिणाम या जमिनी यांच्याकडून घेणाऱ्यांवरती झालेला आहे या सर्व जमिनीची देणाऱ्यांची आणि घेणाऱ्यांची सफल चौकशी झाली पाहिजे अशा स्वरूपाची मागणी जोर धरू लागलेली आहे.
पाटस दौंड रोड वरती मूळ मालक असलेली महिला लपवून दौंड शहरातील प्रतिष्ठित महिला त्या ठिकाणी दाखविली असून या जमिनीची खरेदी श्रीगोंदा तालुक्यातील प्रतिष्ठित एका समूहाने गेली दहा वर्षांपूर्वी घेतलेली होती या बाबतचे सर्व रेकॉर्ड बारकाईने तपासण्याची गरज असून यामध्ये सरकारला फसवणे हा प्रकार तर झालेलाच आहे.
मात्र दुसऱ्या व्यक्तीची फसवणूक करणे अशा स्वरूपाचा सुद्धा गुन्हा होऊ शकतो याची सखोल चौकशी करा अशी मागणी दौंड परिसरातील मान्यवर सर्वसामान्य नागरिक आणि या थोडक्यातून दुखावलेल्या व्यक्ती करू लागले आहेत.


