दौंड नगरपरिषदेच्या तत्कालीन सहाय्यक अभियंत्याने, आका आणि त्याच्या टोळीचा दात काढत घेतला फायदा. कमवली प्रचंड माया

दौंड:आवाज लोकशाहीचा…… (विशेष भाग २)

राजकीय आशीर्वादाने जमिनी फस्त करणाऱ्या टोळीचा फायदा दात काढत नगरपरिषदेचा कनिष्ठ अभियंत्याने घेतला आहे आणि नातेवाईक सगेसोयरे खास मित्र यांच्या नावाने दौंड शहरता व परिसरात व्यापारी गाळे सदनिका तसेच मोकळे भूखंड अशी माया जमवली आहे.

पोलिसात त्याच्या विरोधात भ्रष्टाचार केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे पत्र मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी दिलेले असताना त्याच्या वर काय कारवाई झाली याची माहितीच उघड झाली नाही अशा सत्ताधीशांच्या आशीर्वादाने मदमस्त झालेल्या नगरपालिकेच्या कनिष्ठ अभियंताने मोठी माया कमवली आहे.सध्या सेवानिवृत्त असणारा ठग मात्र लोकांच्या डोक्यातून अजूनही गेलेला नाही.

कागदपत्रात चतुराई पणाचे अंगी लक्षण असलेल्या या व्यक्तीने शासनाचा पगारावर सामाजिक सुधार कामे व्यवस्थित करायची सोडून फसवेगिरी करणाऱ्या टोळीला आपल्या आतल्या हाताने मदत देण्यासाठी मोठ्या जिद्दीने तसेच कसोटीने जोखमदारी नोकरी निभावलेली आहे.

सध्या सेवेत आलेल्या या महाशयांनी नोव्हेंबर १९८६ ला नोकरी मध्ये पाय ठेवला आणि भ्रष्ट कारभाराला २००८ मध्ये सुरवात केली आहे.

याचा दाखला शिवाजी कापरे नावाचे मुख्यकार्यकारी अधिकारी आले होते.त्यांना दौंड पोलिसात २१ जून २०१५  रोजी दौंड पोलिसांना भ्रष्ट कारभार करणाऱ्या या राजकीय आशीर्वादाने बेफाम होऊन वर्तन केलेल्या त्या कनिष्ठ बांधकाम पर्यवेक्षक तक्रार दिल्याने मिळत आहे.

कापरे यांनी सन २००८,२००९ मध्ये १ लाख ११ हजार ७०३ व २००९/२०१० मध्ये ५ लाख ६५ हजार ८२४, २०१०/२०११ मध्ये ८ लाख ५१ हजार २८२, २०११/२०१२ मध्ये ६ लाख १३ हजार १९ हा बांधकाम प्रकरणे तसेच ११/८/२००५ ते २७/११/२०१३ दरम्यान रेखांकन प्रकरणाने मध्ये ८ लाख ८६ हजार १६४ रुपयांच्या कमी रकमा वसूल केल्या या रकमेचे व्याज जवळपास २१ लाख ९० हजार अधिक रुपये पकडल्यास ५२ लाख १८ हजार ८९२ लाख रुपयांचा घोटाळा केलेला म्हणून संबंधितावरती पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यासाठी पत्र दिले होते.

त्याची काय कारवाई झाली की पत्राला केराची टोपली दाखवण्यात आली याची माहिती पोलिसांनी कळूच दिलेले नाही.या पाठीमागे पोलिसांवर असलेल्या राजकीय दबावाचे कारण असू शकते.

दौंड शहरात या इसमाने अनेक ठिकाणीं मोकळ्या जागा तसेच इमारतींमध्ये सदनिका काही व्यापारी गाळे अशी मोठी माया मिळवलेली आहे.

आज सेवानिवृत असला तरी काही ठिकाणी सह भागीदार यांच्या बरोबर भूखंड विक्रीचा व्यवसाय करीत आहे.सर्व परिचित असलेल्या या ठगाला शहरात कोण ओळखत नाही असे काहीच नाही.त्याने सेवेत असताना काय दिवे लावले आणि कोणाचे कर माफ केले याचा सर्व लेखा जोखा कापरे या मुख्यकार्यकारी अधिकाऱ्यांच्या दौंड पोलिसांना दिलेल्या पत्रा मध्ये उघड होत आहे.

त्याच्या या सर्व कारभाराची पाळेमुळे पुनर्वसन जमिनीच्या खरेदी विक्रीच्या दौंड परिसरातील थोडीशी संलग्न असून या टोळीवर मेहेरबानी करतात आणि शहरालगतच्या यांच्या खरेदी विक्रीच्या जमिनीला नगरपालिकेतील परवानगी देताना याने सर्व माया कमावलेली आहे.

बुद्धिमत्तेच्या चातुर्याची याने यात कसब दाखवला असून ही सर्व मालमत्ता जीवाचे मित्र नातेवाईक आणि काही सहकाऱ्यांच्या नावावर करून आपल्यासाठी मोठीं कमाई करून ठेवली आहे

सद्या दौंड शहराच्या आसपास असलेल्या काही इमारती बंगलो वादग्रस्त म्हणून प्रसिद्ध असून या सर्व वादग्रस्त भानगडीत राजकीय मान्यवरांचा हस्तक्षेप असल्याने अद्याप पर्यंत कुठल्या स्वरूपाची ठोस कारवाई केली गेली नाही याचा खरा फायदा या ठगाला झाला असून सेवानिवृत्ती नंतर सुद्धा त्याच्या प्लॉटिंग विक्रीचा व्यवसाय सुरळीत पणाने सुरू आहे.

विशेष वाचा

जवळपास ५२ लाखांला दौंड नगरपालिकेला करांच्या माध्यमातून टोपी घालणाऱ्या या ठगाणे कोणाच्या सदनिकांच्या कामात सवलती दिल्या कोणाचे जमिनी भूखंडाची रेखांकणे मंजूर केली याची सकस चौकशी केल्यास यामध्ये या टोळीतील बहुतांश लोकांच्या बांधकाम  आणि भूखंड   निघतील याबद्दल अनेकांनी ठामपणे मत व्यक्त केलेले आहे.पण याची चौकशी कोण करणार हा प्रश्न खऱ्या अर्थाने ऐरणी वरचा विषय आहे.