दौंड:आवाज लोकशाहीचा
विशेष -: (भाग१)
राजकारणी,शासनाचा सेवक,पत्रकार व दलाल यांच्या युतीने दौंड तालुक्यात पुनर्वसन घोटाळा झालेला आहे असे ठाम मत तालुक्यातील नागरिक बोलू लागले आहे.हा घोटाळा बाहेर पडू नये म्हणून अनेकांनी आपापल्या पद्धतीने प्रकरणे दाबून टाकली आहेत सामान्य नागरिकांवर होणाऱ्या अन्यायाला वाचा कोण फोडणार आणि त्यांना न्याय कोण देणार अशी चर्चा आता पुनर्वसन नागरिकांकडून या ७०० एकर जमीन घोटाळ्या विषयावर होऊ लागली आहे.
अशा या घोटाळ्याची बातमी प्रकाशित येऊ नये म्हणून पत्रकार शासन स्तरावर आपली कामे व्यवस्थित करून घेता यावीत यासाठी तलाठी,मंडल अधिकारी,नगरपालिकेचा अभियंता आणि या सर्वांच्या मदतीला स्टॅम्प विक्रेता आणि बांधकाम व्यवसाय या सर्वांच्या कडूनही कामात अडचण झाल्यास राजकीय आशीर्वाद मिळावा म्हणून आका आणि त्यांचे अनाजीपंत अशी टोळी निर्माण झाल्याने गोरगरीबांच्या जमिनी सद्या राजरोसपणे विकल्या जातात त्यांना फसवल जात खोटी माणसे उभी करून खरेदी खत केली जातात अश्या अनेक घटना तालुक्यातील दौंड शहरासह परिसरातील गावांमधून घडल्या आहेत..
आरसा आणि त्याच्या भानगडी |
दौंड तालुक्यातील पारगाव येथे एका दलित कुटुंबाच्या जमिनीचा व्यवहार अशा महाशयांनी राजकीय आशीर्वादाचा जोरावर केलेला आहे.त्या बाबत शासन दरबारी भोगवटा वर्ग २ ची जमीन आपल्या ताब्यात मिळावी म्हणून जीवाचा रान करणाऱ्या महाशयांनी तहसील,प्रांत आणि वरिष्ठ कार्यालयात आपली ताकद दाखवण्याचा प्रयत्न केला आहे..
मात्र अद्यापही यश हाती आलेले नाही.पुनर्वसन जमिनी विक्री खरेदीच्या नादाला चांगलाच लागलेला आहे.तो केडगाव परिसरातला राजकीय आशीर्वादाचा खबरी शिलेदार म्हणून ओळखला जातो.यवत परिसरात त्यांचाच व्यवसायिक भाऊ आहे.भोसलेवाडी,उंडवडी परिसरात त्याने पण पुनर्वसन जमिनीवर डल्ला मारला आहे.समाजाचा आरसा संबोधला गेला त्याला चौथा स्तंभ म्हणून सन्मान मिळाला आहे.
मात्र दौंड तालुक्यात काहींचा बाज्या वेगळाच आहे.पत्रकार त्यांची उर्मी आणि अधिकारी वर्गावर राजकीय आशीर्वादाने वागण्याची गुर्मी वेगळीच दिसते आहे.पाटेठाण मध्ये याच्या मनासारखा विषय झाला नाही म्हणून बातमी छपून दडपण टाकण्यात गेली आहे.
सद्या सामाजिक प्रश्न आणि समाज विघटित होणाऱ्या घटनांकडे जाणून बुजून दुर्लक्ष करून राजकीय जोडे उचलण्याची स्पर्धा लागलेली आहे.याचा विपरीत परिणाम झालेला आहे.
राजकीय गटा-तटात या आरश्यान लोकांनी वरणी लावली आहे.काहीं खास दुत काही निःसीम भक्त बनले आहेत आणि यातूनच असले धंदे राजरोस पने करू लागले आहेत..
शासन प्रतिनिधी
दौंड तालुक्यात सरकारचा पगार घेऊन राजकारण्यांची चाकरी करतोय असे काम एका मंडल अधिकाऱ्याने केले आहे.जवळपास २० वर्ष त्याने एकाच ठिकाणी नोकरी केली अर्थात त्याला राजकीय आभय मिळालेले होते.
पुनर्वसन जमिनीचा महाघोटाळा त्याने सुरू केला होता सद्या ते हयात नाहीत देवाघरी गेले आहेत.त्यांच्या बरोबर काही तलाठी मंडळी मागे राहिली नाहीत.अनेक तलाठी जमिनीच्या व्यवहारात गुरफटले आहेत.उघडपणे दिसत नसले तरी पदाद्या आड चे प्रमुख सूत्रधार असून ते दिशादर्शक झालेले आहेत.
दौंड तालुक्यातील असंख्य पुनर्वसनाच्या जमिनींचे तसेच वतनांच्या जमिनीचे रेकॉर्ड दलालांना देण्यामध्ये त्यांचा फार मोठा सिंहाचा वाटा आहे.अशा जमिनी या वादग्रस्त होऊन गोरगरिबांच्या परिवाराला अर्थकारणाने मानसिकतेने तान-तणावाचे वातावर निर्माण झालेले आहेत.अनेक परिवाराची फसवणूक झालेली आहे.अनेकांना जगणे अवघड झालेले आहे..
विशेष वाचा
दौंड शहराला लगत असलेल्या गोपळवाडी, लिंगाळी,सोनावडी,पाटस दौंड रोड गार,खोरवडी,बोरीबेल देऊळगाव राजे या परिसरातील पुनर्वसन जमिनीत पुण्याचा दलाला दौंड मधील स्टॅम्प विक्रेता नगरपालिकेचा तत्कालीन अभियंता आका व त्यांच्या टोळीने बहुतांश ठिकाणच्या जमिनीचा खरेदी विक्री व्यवहार केलेला आहे.
मात्र या विभागामध्ये अनेक उलट सुलट धंदे चुकीचे कारभार केले गेलेले आहेत याबाबत अनेक तक्रारी होत आहेत.राजकीय आशीर्वादाने पीडित असलेल्या या टोळीचा या तक्रारी बाबत दखल घेतली जात नाही ही बाब खेदजनक आहे याचा गुरखा आवाज लोकशाहीचा ने उघड करण्यास सुरुवात केलेली आहे.
या घटनेमुळे अनेकांची धाबे दणाणले असून पाटस दौंड रोड वरती अनोळखी व्यक्तीला उभी करून एका जमिनीचे खरेदी विक्री झालेली आहे याचा लवकरच पुराव्यानिशी पंचनामा आवाज लोकशाहीचा मधून होणार आहे.
(उद्या वाचा :- अभियंत्यांची कमाल आर्थिक कमाई करून केली धमाल |)



