रावणगाव:आवाज लोकशाहीचा
दौंड तालुक्यातील स्वामी चिंचोली येथील मिंढे वस्ती आईनेच अडीच वर्षांच्या मुलीला आणि एक वर्षाच्या मुलाला गळा दाबून खून केला आणि नवऱ्याच्या मानेवर आणि डोक्यावर वार केले.घरगुती वादातून ही घटना घडल्याची प्राथमिक माहिती दौंड पोलिसांनी दिली आहे.
मुलगी पिऊ दुर्योधन मिंढे वय-अडीच वर्षे, मुलगा शंभू दुर्योधन मिंढे वय-एक वर्षं या चिमुकल्यांच्या गळा दाबून खून केला, नंतर नवरा दुर्योधन बाळासाहेब मिंढे याच्या मानेवर आणि डोक्यावर वार केले आहे..
या मध्ये नवरा जखमी असून बारामती येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.एकाच वेळी आईनेच दोन वर्षाच्या मुलीची व एक वर्षाच्या मुलाची गळा दाबून हत्या केली एवढ्यावरच न थांबता नवऱ्याच्या मानेवर आणि वार केला.तिला एकाच वेळी घर संपवायचं होतं असंच यातून दिसून येते ही घटना शनिवारी दि ८ पहाटे ४ ते वाजण्याच्या आसपास घडली आहे.
दुर्योधन यांची पत्नी कोमल दुर्योधन मिंढे हिला पोलिसांनी ताब्यात घेतले असून पोलीस पुढील तपास करीत आहेत.
घटनेची माहिती मिळताच दौंड उपविभागीय पोलिस अधिकारी बापूराव दडस,दौंड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गोपाळ पवार,सहाय्यक पोलीस निरीक्षक नागनाथ पाटील यांनी घटनास्थळी धाव घेतली होती.पोलिसांनी आरोपी महिलेला ताब्यात घेतले असून पुढील तपास दौंड पोलीस करीत आहेत.



