सरपंच वस्ती परिसरात वळूचा धुमाकूळ

नागरिकांनी सावध रहावे,अफवांवर विश्वास ठेवू नये-मुख्याधिकारी विजय कावळे

दौंड:आवाज लोकशाहीचा
विशेष प्रतिनिधी:विठ्ठल होले

सरपंच वस्ती परिसरात वळूचा धुमाकूळ

दौंड शहरातील मोकाट जनावरांचा प्रश्न एरणीवर आला आहे.मोकाट जनावरे रस्त्यावर कचरा कुंडी परिसरात उभे राहून वाहतुकीस अडथळा निर्माण करीत आहेत.छोट्या छोट्या वाहनांना धडक देऊन अपघात होत आहेत.सरपंच वस्ती परिसरात एका वळूने धुमाकूळ घातला असून गाड्यांची तोडफोड केली आहे.

येणाऱ्या जाणाऱ्या लोकांच्या मागे पळत आहे.यावेळी नगरपालिका मुख्याधिकारी विजय कावळे यांनी सदर ठिकाणी येऊन पाहणी केली असून वळूला पकडण्यासाठी रेस्क्यू टीमला फोन करून बोलावून घेतले असून वैद्यकीय अधिकारी यांनाही याविषयी मुख्याधिकारी विजय कावळे यांनी कळविले आहे.

यावेळी मुख्याधिकारी विजय कावळे,आरोग्य अधिकारी शाहू पाटील,राजेंद्र सोनवणे, विशाल ओहोळ आदी कर्मचाऱ्यांसह उपस्थित होते,वळूची माहिती घेऊन त्याला पकडण्यासाठी टीम बोलावली आहे.यावेळी विजय कावळे यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की कुणीही त्याच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करू नये तसेच अफवांवर विश्वास ठेवू नये.