दौंड:आवाज लोकशाहीचा
दौंड तालुक्यामध्ये पुनर्वसन जमिनीचा जवळपास पाचशे कोटी अधिक रुपयांचा महा घोटाळा उघड होण्याची शक्यता आहे.मागील १२ वर्षा पूर्वी (सन २०१३ साली) बोगस जमीन वाटप झाल्याने पुरंदर प्रांत कार्यालय यांच्या मार्फत मोठी कारवाई केली असताना जवळपास २८७ हेक्टर ८४ आर एवढे क्षेत्र ताब्यात घेलेले होते.
ताब्यात घेवून सरकार जमा असा शेरा मारून सातबारा वरती वाटप बोगस घेतलेल्या व्यक्तींची नावे कमी करू सरकार जमा सातबारा तयार केलेला होता सद्या ती जमीन एकर मधे पाहिल्यास ७०० एकर अधिक आहे..
सद्या जमीन विक्रीचा व्यवसाय तेजीत असल्याने या मधील जिरायत आणि बागायत जमिनीचा बाजारभाव पाहिल्यास कमीत कमी २० लाख आणि जास्तीत जास्त ५० लाखा पेक्षा एकरी जास्त असल्याने जवळपास सरासरी या जमिनींची साधारण किंमत पाचशे कोटीच्या आसपास होऊ शकते.
२०१३ मधे दौंड शहर आसपास सोनवडी आणि दौंड या ठिकाणी जमिनीचे बाजारभाव प्रचंड आहेत.कोट्यवधी रुपयांचा व्यवहार या ठिकाणी दलाल यांनी केलेला आहे.शहरा लगत असलेल्या जमिनी मधे मोठे गौड बंगला झालेले आहे आणि त्यात जिल्हा पुनर्वसन विभाग तत्कालीन दोन पुरंदर प्रांत कार्यालय काही सर्कल आणि काही तलाठी यांचा मोठा सहभाग आहे.
दौंड तालुक्यात शहरा लगतच्या जमिनीमध्ये एका टोळीचा मोठा सहभाग असून या टोळीचा फायदा तरुण नगर परिषदेतील एका तत्काली अधिकाऱ्याने मोठ्या प्रमाणात घेतला त्याच बरोबर गंगेत हात धुवून घ्यावे तसे एक स्टॅम्प विक्रेता सुद्धा यांनी आपला हात धुवून घेतलेला आहे.
या दोघांनी कोणतेही कष्ट न करता या टोळीकडून आलेल्या जमिनींचे कागदपत्रे व्यवहार आणि नगर पालिकेतील परवान देण्याचं काम केल असून बदल्यामध्ये मोठी आर्थिक माया घेतलेली आहे अशा स्वरूपाची ओरड शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात असून शहरा लगतच्या या जमिनीची प्रामाणिकपणाने कसून चौकशी केल्यास महा घोटाळा उघड होऊ शकतो तसेच ग्रामीण भागात याची मोठ्या प्रमाणात पालेमुळे असून काही दलाल आणि एजंट यांच्या बरोबर ती भुरट्या राजकारण्यांनी सुद्धा हात धुवून घेतलेले आहेत.
| विशेष हे महत्वाचे वाचा
दौंड शहर लगत असणाऱ्या आणि वाटप बोगस झाल्या म्हणून ताब्यात घेतल्या जमिनींची संख्या जवळपास १५ हेक्टर असून यातील सोनवडी, गोपळवाडी,आणि दौंड असा भाग आहे.त्यात जमीन गट नंबर ८७/२ब विनायक दिनकर पासलकर यांनी बोगस जमीन मिळवलेली आहे.दोन एकर क्षेत्र सरकार जमा झाले असून दिनांक २८ नोव्हेंबर २०१४ ला ही कारवाई झालेली आहे.
चिंतामण मारुती पासलकर यांनी सोनवडी मध्ये जमीन गट नंबर ४७/१ असून ८० आर जमीन सरकारने ताब्यात घेतलेली आहे.याच गावात सोनू रंगू पासलकर यांनी गट नंबर २१९ मधे १.३८ एवढी जमीन मिळवलेली होती.अजून दोन खातेदार या ठिकाणी आहेत.
पैकी बारकु विठू शेडगे यांनी गट नंबर १६६/२ मधे ४० आर जमीन लाटलेली होती.दुसरे दोन खातेदार असून धोंडीबा कोंडीबा पायगुडे व इतर यांनी जमीन गट नंबर १६६/२,७८/१, o.८०,३०८/३०.६८ मधे २ हेक्टर १८ आर जमीन मिळवलेली होती.या सर्व जमिनी शासनाने ३० जून २०१५ ला ताब्यात घेऊन सरकार जमा असा शेरा सातबारा वरती दिलेला आहे.
महादू रंगू कडू व इतर यांनी दौंड शहरात जमीन गट नंबर ३२२/४(५५/४)३२३/२(५७/२/१) मध्ये २ हेक्टर १आर जमीन लाटलेली होती.तिची सरकारने ताब्यात घेतलेली तारीख १३ एप्रिल २०१५ आहे.
राधाबाई बाळा भोसले व इतर यांनी जमीन गट नंबर दौंड मध्ये ३२२/४ (५५/४) मधे ८०आर क्षेत्र मिळवले होते ते शासनाने ८ जून २०१५ ला सरकार जमा केलेले आहे.
नंदा हरी जगदाळे यांच्या नावावर जमीन जाता नंबर भूखंड क्रमांक ७६,७७ मधे ४ आर जमीन मिळवलेली होती ती सुधा दिनांक १७ ऑगस्ट २०१५ मधे सरकार जमा झालेली आहे.
ज्ञानोबा बाबुराव पासलकर यांनी दौंड मध्ये जमीन गट क्रमांक ४४/१ मधे ८१ आर क्षेत्र मिळविलेले होते ते सरकार जमा दिनांक २४ ऑगस्ट २०१५ मधे झालेले आहे.
मालनबाई दामोदर कांबळे यांनी दौंड जमीन गट नंबर ९७/३९ मधे ४ आर क्षेत्राचा भूखंड मिळवला होता तो २६ ऑगस्ट २०१५ ला सरकार जमा केला गेला आहे.
दौंड शहराला लागून असलेल्या गोपळवाडी जमीन गट क्रमांक ५३/५ मधे ८१ आर क्षेत्र सोनबा रंगू पासलकर ज्ञानोबा सोनबा पासलकर व इतर यांनी मिळवला होता तो दिनांक १७ ऑगस्ट २०१५ मधे सरकार जमा करण्यात आलेला आहे.
दौंड शहरा लगत असलेल्या या जमिनीच्या किमती प्रचंड असल्याकारणाने हे भूखंड सरकार जमा होऊन सुद्धा पाच तारखेला यांचे वाटप खातेदारांना करण्यात आलेले आहे.मात्र याची माहिती विभागीय प्रांताधिकारी आणि दौंड तहसीलदार यांच्याशी संबंधित नसून अशा जमिनी वाटपाचे काम जिल्हा पुनर्वसन विभाग यांच्याकडून होत असल्याने या विभागातून मोठ्या प्रमाणात जमिनीची खिरापत वाटली जात तर नाही ना अशा स्वरूपाची शंका नागरिक व्यक्त करू लागले आहेत.
दौंड तालुक्यामध्ये जवळपास ७०० एकरवपेक्षा अधिक जमिनीचा सातबारा सरकारने परत केलेला होता मात्र या सर्व जमिनी गायब आहेत.
फेरवाटप झालेले आहेत हे वाटप कोणत्या आधारे कोणासाठी केले आणि त्यासाठी कोणी प्रयत्न केले ही सर्व माहिती शोध मोहिमेचा विषय असून प्रामाणिकपणाने आणि कसून चौकशी केल्यास अनेक दलाल त्यांचे आकार आणि त्यांची टोळी यातून उघडी पडेल आणि या जमिनी कशा स्वरूपाने लुटल्या याचं स्वरूप समाजापुढे उघडे होईल यात शंका नाही..



