पुनर्वसन अधिकाऱ्यांची बेइमानी ?७०० एकर अधिक जमिनीच्या दुबार वाटप |

दौंड:आवज लोकशाहीचा

चिरीमिरी साठी बेईमान झालेल्या पुनर्वसन विभगाचा भ्रष्ट कारभार उघडा पडला आहे.सरकारी पगार असताना सुधा वर कमाई करण्याच्या नादात दौंड तालुक्यात ७०० अधिक एकर जमिनी दोनदा वाटप झालेल्या असल्याने हा भ्रष्ट कारभार उघड झाला आहे..

जमिनी  वाटप करताना त्यांनी शासनाच्या निर्णयाला पाहिलं नाही का? जाणून बुजून हात ओले करून हा कार्यक्रम केला आहे हा प्रश्न त्यांच्या उघड झालेल्या प्रकरणा वरून समोर आले आहे.

दौंड तहसील मधील मिळालेली माहिती आणि हाती आलेल्या रेकॉर्ड नुसार दौंड तालुक्यात ७०० एकर जमिनीच्या घोळ बाहेर निघाला आहे.वाटप झालेल्या कडून त्या परत घेऊन शासन नाव सातबारा करण्यात आला आहे.

२०१३ मधे दौंड तहसीलदार यांच्या कडून अश्या जमिनी ताब्यात घेतल्या असल्या तरी या जमिनीवर दलालांनी नवे खातेदार शोधून त्यांना मिळवून देत असून त्यांचा खरेदी विक्री करण्याचा यशस्वी प्रयत्न सुद्धा केल्याने या जमिनी आता शिल्लक किती आहेत याचा शोध घेणे काळाची गरज आहे.

पुनर्वसन घोटाळा या निमित्ताने निर्माण झाला असून कोट्यवधी रुपयांच्या जमिनीची हेराफेरी दलाला,त्यांचा आशीर्वाद असलेला आका त्यांची असणारी टोळी यांनी केली आहे.सद्या दौंड तालुक्यात या जमिनी लाटणारी टोळी सद्या मदमस्त झालेली असल्याने अनेक गरिबांच्या कुटुंबांना त्यांच्या कडून त्रास होऊ लागला आहे.

विशेष वाचा ::-::

चोरावर मोर

दौंड शहरालगत असलेल्या पुनर्वसन जमिनीच्या खरेदी विक्रीत गौड बंगाल करणाऱ्यांना दौंडच्या स्टॅम्प व्हेंडर ने आणि नगर पालिकेतील एका तत्कालीन इंजिरीयन ने डाव साधला आणि भरपूर माया जवमली आहे ते जणू चोरावर मोर झालेले आहेत

दौंड तालुक्यात या दोघांची मोठी खळबळ जनक घडामोडी सुरू झाल्या आहेत.या पैकी त्यांनी दौंड नगरपरिषदेच्या माध्यमातून अनेक चुकीचे कामे सुरू केली होती,त्याने अनाठाई स्वरूपाची कागदपत्रे केली आहेत.चुकीच्या परवानग्या दिल्या आहेत याची प्रामाणिक अधिकाऱ्यां कडून चौकशी झाली पाहिजे अशी मागणी सद्या दौंड शहर व तालुक्यात जोरवलेली आहे.