वरवंड:आवाज लोकशाहीचा
दौंड तालुक्यातील जिरायती भागातील पडवी गावाला उन्हाळ्यात पिण्याच्या-पाण्या बरोबर शेतीच्या पाण्यासाठी संघर्ष करावा लागतो मात्र येथील शेतकरी तुषार शितोळे या युवकांने नोकरीच्या माघे न लागता वडिलांबरोबर शेती करण्यास सुरुवात केली..
शेतीला जोड धंदा म्हणून त्यांनी गावरान खिल्लार गाईंचे संगोपन करण्याचा विचार आला आणि निर्णय घेतला.गावरान गाय खरेदी करीत असताना या गाई दूध व्यवसायासाठी न घेता हौस म्हणून पाळण्यासाठी खरेदी केल्या होत्या.
त्यातून गावरान गाई वाढवत जाऊन त्यांच्या गोठ्यात आज पाच ते सहा गावरान गाई उपलब्ध झाल्या आहे यासाठी त्यांनी कस्थ घेतले आहे.गाईंचे कालवड बैलगाडा शर्यतीमध्ये वापरले जात असल्याने आपल्याला त्याची मागणी येऊ शकते या कल्पनेतून या गावरान गाई चा गोठा निर्माण करण्याची इच्छा शक्ती त्यांना झाली होती.गावरान जातीच्या कालवड्यांना बैलगाडा शर्यती मध्ये गावरान बैलांची जास्त मागणी आहे हे ही त्यांना लक्ष्यात आले होते.
तर या गावरान देशी गायीचे दूध,शेणखत,गोमूत्र याची देशभरातून चांगली मागणी आहे.या देशी गावरान गायचा दूध व गोमुत्र आयुर्वेदामध्ये महत्त्व सांगितले असल्याने यातून गावरान देशी गाई गोठ्यात पाहिल्यानंतर पैशापेक्षा गायी जास्त महत्त्वाचा वाटतात आमच्या कुटुंबातील प्रत्येक सदस्य या गावरान गाईची सेवा करत असतात याचा आम्हा परिवाराला आनंद होत आहे.



