दौंड:आवाज लोकशाहीचा
विशेष प्रतिनीधी:विठ्ठल होले
दौंड तालुक्यातील गिरीम गावच्या हद्दीतील वायरलेस फाटा येथे एका अल्पवयीन मुलीवर तिच्याच चुलत भावाने मित्राच्या मदतीने वर्षभर वेगवेगळ्या ठिकाणी बलात्कार केला असल्याने पीडित मुलगी गर्भवती झाल्याने प्रकार उघड झाला आहे.दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली असल्याची माहिती दाखल अमलदार सहायक पोलीस फौजदार संतोष शिंदे यांनी दिली आहे.
ही घटना मार्च २०२४ पासून सुरू झाली असल्याचे पिडीत मुलीने शुध्दीवर आल्यानंतर दाखल केलेल्या तक्रारीत म्हटले आहे,त्या मुलीचे वय १४ वर्ष ९ महिने १६ दिवस असून तिने एका मुलीला जन्म दिला आहे.बाळंत होताना तीन दिवस बेशुद्ध झाली असल्याचे पोलिसांनी माहिती दिली आहे.
पीडित मुलगी ही अल्पवयीन असल्याचे माहीत असतानाही या नराधमांनी आपली वासना शमवली आहे,आणि हे जर कोणाला सांगितले तर तुला मारून करून टाकू अशी धमकी दिल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
अत्याचाराचा कळस म्हणजे या आरोपी मध्ये पीडित मुलीचा चुलत भाऊ सामील आहे.त्याने बहीण भावाच्या नात्याला काळीमा फासली आहे.या मुलीवर अत्याचार करणारे अवि धायगुडे आणि शुभम पंढरीनाथ साबळे या दोघांना दौंड पोलीसांनी अटक करून त्यांच्यावर गुन्हा रजिस्टर नंबर ८८/२५ भारतीय दंड संहिता चे कलम ३७६ (२)(i) ५०४ लैंगिक अपराधापासून बालकांचे संरक्षण अधिनियम४,६,८,१२ नुसार दाखल केला आहे.
दोन्ही आरोपींना मा न्यायालयात हजर केले असता ४ फेब्रुवारी पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
पोलीस निरीक्षक गोपाळराव पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरिक्षक युवराज घोडके पुढील तपास करीत आहेत.



