दौंड: आवाज लोकशाहीचा
विशेष प्रतिनिधी : विठ्ठल होले
दौंड तालुक्यातील पेडगावच्या हद्दीतील रामभाऊ गोधडे यांच्या मालकीच्या जागेत दिलीप सांगळे यांच्याकडे कोळसा काम करणारे मजूर हरिश्चंद्र उर्फ हरिभाऊ नवश्या वाघमारे आणि लिला उर्फ रुपाली गणेश वाघमारे यांनी मिळून त्यांच्या बरोबर काम करणारे ज्येष्ठ चंदर गणपत जाधव (वय-६० वर्षे) यांचा किरकोळ कारणातून कसल्यातरी हत्याराने गळ्यावर हनुवटीवर हातावर वार करून खून केला होता.
जाधव यांचा मृतदेह उसाच्या फडात पाचटाच्या खाली झाकून दोघेही पळून गेले होते,ही घटना ६/०३/२०२३ रोजी घडली होती तेव्हा पासून हे आरोपी फरार होते,पोलीस निरीक्षक गोपाळराव पवार यांनी या आरोपींच्या शोधात टीम तयार करून कर्नाटक राज्यात पाठवले कोळसा काढण्याचे काम करत असताना आरोपी हरिभाऊ वाघमारे याला आठ दिवसा पूर्वी केली होती,त्याची साथीदार लिला उर्फ रुपाली गणेश वाघमारे (वय-35वर्षे ) राहणार भूनेश्वर तालुका रोहा,जिल्हा रायगड ही काल अनंतपुर आंध्रप्रदेश येथून रेल्वेने दौंड मार्गे रायगड इथे जात असल्याची माहिती मिळाली त्यानुसार तिला दौंड रेल्वे स्टेशन येथे सापळा रचून अटक केली आहे.
दोन वर्षापासून खून करून फरार असलेल्या दोन्ही आरोपींना आठ दिवसात अटक करून कोर्टात हजर केले आहे,पोलीस निरीक्षक गोपाळराव पवार आणि त्याच्या सर्व स्टाफ चे वरिष्ठांकडून अभिनंदन करून कौतुकाची थाप मिळाली आहे.



