वरवंड ग्रामपंचायत मध्ये सारथी योजनांची माहिती विद्यार्थ्यांनी ग्रामसभेत मांडली.

पाटस:आवाज लोकशाहीचा

दौंड तालुक्यातील अनेक ग्रामपंचायतीमध्ये सारथी योजनांची माहिती विद्यार्थ्यांच्या वतीने ग्रामसभेत वाचन करून महत्त्व सांगण्यात आले आहे असल्याने या निमित्ताने या योजनेचा लाभ अनेकांनी घ्यावा असे अहवान ही करण्यात आले आहे

छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी),पुणे (नियोजन विभागा अंतर्गत महाराष्ट्र शासनाची स्वायत्त संस्था) व महाराष्ट्र ज्ञान महामंडळ मर्यादित (एमकेसीएल),पुणे यांच्या सारथी पुणे व एमकेसीएल पुणे यांच्या द्वारे “छत्रपती संभाजी महाराज सारथी युवा व्यक्तिमत्त्व विकास व संगणक कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम” संपूर्ण महाराष्ट्रात तालुकास्तरापर्यंत राबविण्यासाठी मराठा, कुणबी, कुणबी-मराठा आणि मराठा-कुणबी समाजाच्या नॉन क्रिमिलेयर गटाच्या युवांसाठी निःशुल्क कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना मोफत प्रशिक्षण वर्ष २०२५ मध्ये सक्सेस कंप्युटर इन्स्टिट्युट वरवंड येथे दिले जाते असे संस्थेचे संचालक प्राध्यापक आकाश रमेश काकडे यांनी माहिती दिली आहे.

या प्रशिक्षणा बद्दल माहिती सर्व लाभार्थ्यां पर्यंत पोहचावी या उद्देशाने ग्रामसभेत योजनांची माहिती देण्याचा उपक्रम सारथी व एम.के.सी.एल यांच्या वतीने सारथी च्या विद्यार्थ्यानं मार्फत ग्रामसभेत योजनांची माहिती देण्यात आली असताना

या मध्ये सहभागी विद्यार्थी यांनी ग्रामपंचायत वरवंड,केडगाव, बोरीपार्धी,पाटस,देऊळगाव गाडा,हिंगणीगाडा हातवळण या ग्रामपंचायती मध्ये माहिती दिली आहे..

या मध्ये सहभागी सर्व विद्यार्थी विद्यार्थिनींनी या योजनेत उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला या योजनेत सहभागी विद्यार्थी पुढील प्रमाणे कोमल दिवेकर,प्राजक्ता दिवेकर, अपर्णा दिवेकर,वृषाली देशमुख,शुभांगी दिवेकर,माधुरी दोरगे, निकिता माने,रूपाली दिवेकर,गायत्री शितोळे,ज्ञानेश शितोळे,यश जगताप, नयना खराडे,श्वेता शितोळे,तनुजा खराडे,यश कुमार खराडे व इतर सर्व सहभागी होते.

हा उपक्रम यशस्वी होण्याकरीता सर्व ग्रामपंचायत पदाधिकारी सरपंच सदस्य या सर्वांचे मोलाचे सहकार्य लाभले असल्याची अशी माहिती आकाश काकडे यांनी दिली आहे.