दौंड:आवाज लोकशाहीचा
दौंड तालुक्यातील पुनर्वसन जमिनीच्या दलालांचे आणि त्यांना मदत करणाऱ्या महसूल विभगातील कारभाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत आवाज लोकशाहीच्या वतीने पुनर्वसन विषयाच्या मालिकेने त्यांच्या हालचाली थंडवल्या आहेत तालुक्यात या विषयाने वातावरण थंडा थंडा कुल कुल झाले आहे.
दौंड तहसील कार्यालयात पुनर्वसनाच्या कागदपत्रांची तपासणी सुरू झाली असून आतून अनेक भानगडी उघड्या होण्याची भीती या सर्वांना वाटू लागल्याने वशिला लाऊन यातून पळवाटा शोधण्यासाठी राजकीय आशीर्वादाचा उपयोग करण्याचा घाट घातला आहे.दौंड शहरातील या भानगडीत असलेला स्टॅम्प विक्रेता दलाल आणि त्याची टोळी कमालाची गडबड निर्माण झालेली आहे.
असाच प्रकार दौंड तालुक्यातील ग्रामीण भागात असणाऱ्या केडगाव,यवत,दापोडी,पिंपळगाव आदी भागातील दलालांन मधे सुधा पडसाद उमटल्या मुळे बरेच जण भूमिगत झालेले आहेत.
पुनर्वसन जमिनी मधून उलट सुलट कामे करीत अनेकांनी मोठी माया जमवलेली आहे.काही लोकांच्या जमिनी यांनी गोड बोलून फसवून कुलमुखत्यार म्हणून खरेदीखत करून घेतल्या आहेत.
यवत स्टेशन मध्ये अश्याच दलालाने उगाच पुनर्वसन धारक नावाने जमिनीच्या साठी खातेदार बनवून त्याला कानगाव परिसरात जमीन मिळवून देण्याचा यशस्वी प्रयत्न सुद्धा केलेला आहे.
एकच खातेदाराच्या नावाने दोन दोन ठिकाणी जमिनी मिळवून त्या विकण्याचा प्रताप सुद्धा दलाल करून बसले आहेत.
तालुक्यात या व्यवसायात भरपूर माया मिळते म्हणून पत्रकार सुद्धा दलालांचे सोबती बनले आहेत.कागदपत्रात अडचण आल्यास आपल्या पत्रकारितेचा दबाव अधिकारी तलाठी मंडलाधिकारी यांच्या वर निर्माण करून काम करून घेण्याचे प्रकार झाले आहेत.
पाटेठाण,पारगाव,वाखरी,केडगाव,पूर्व भागातील काही गावात अशी प्रकाराने करून घेतलेल्या पत्रकारांची ओळख अनेक जमीन खरेदी विक्री करणाऱ्या ना परिचित झालेली आहेत.
गोरगरीबांच्या जमिनी विकून माया मिळवण्याचा हा गोरख धंदा सुरळीत असावा त्याच्या बातम्या उघड होऊ नये म्हणून दलालांचा पत्रकारना बरोबर घेऊन काम करण्याचा फंडा तालुक्यात यशस्वी झालेला आहे.
आवाज लोकशाहीचा मधून या विषयावर आवाज उठवल्याने त्यांची अडचण निर्माण झालेली असून आपला डाव उघड होऊ नये यासाठी सद्या त्यांनी कुल राहणे पसंत केले आहे.
तालुक्यात जिल्हा पुनर्वसन अधिकारी यांनी येऊन दौंड तहसील विभागात मीटिंग घेऊन सूचना दिल्यावर कामाला गती मिळालेली आहे.सद्या तहसील कार्यालयात पुनर्वसन विषयाची कागदपत्रे बारकाईने तपासली जात असल्याने दलाल आणि त्यांच्या टोळीचे धाबे दणाणले आहेत.
विशेष वाचा
कपड्याचा दुकानात काम करणारा आणि त्यातून स्टॅम्प विक्री करण्याचा धंदा करणारा सध्या दौंड मध्ये बिल्डर अनेक जमिनीचा मालक हॉटेलचा मालक चार-पाच व्यावसायिक गाळे कसे कमवू शकतो अशी शंका आणि टीका-टिपणी शहरातील पुनर्वसन जमिनीच्या घोटाळ्यात असणाऱ्या स्टॅम्प विक्रेत्या बाबत होऊ लागलेली आहे.
वस्तुनिष्ठ परिस्थिती याची चौकशी झाल्याशिवाय समोर येणारी नसली तरी सध्या हा बिचारा नागरिकांच्या टीकेचा धनी होत आहे.



