यवत:आवाज लोकशाहीचा
जातीवाचक शिवीगाळ करीत लाकडी काठी प्लास्टिक पाईप आणि लाथा बुक्यानी एका महिलेसह तीन लोकांनी दलीत समजतील ७० वर्ष वृद्ध असलेल्या आजीला आणि तिच्या मुलीला जबरदस्त मारहाण करून जाती वाचक शिवीगाळ केल्या प्रकरणी यवत पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आली आहे.
यवत पोलिसांमध्ये याबाबत जखमी मुलगी सविता तानाजी गायकवाड हिने शंकर अंकुश दोरगे मयूर शंकर दुरगे,मोन्या हनुमंत दोरगे,सुनिता शंकर दोरगे यांच्या विरोधामध्ये फिर्याद दिली असून तिची म्हातारी आई,तानाजी गायकवाड हे सुद्धा गंभीर जखमी झाली आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की,आमच्या राहत्या घरी सकाळी फिर्यादी मध्ये दिलेले सर्व लोक पूर्वीच्या जमिनीच्या वादाचा विषय काढून त्यांनी आमच्याशी शिवीगाळ करीत वाद घालण्यास सुरुवात केला यावेळी आम्ही दोघेच घरी होतो शिविगाळी आणि दमदाटी करू नका असे मी सांगत असताना त्यांनी मला मारण्यास सुरुवात केली तेव्हा माझी आई त्यांना थांबवण्यासाठी आली असता त्यांनी जातीवाचक भाषा वापरून आमच्या शेजारी राहण्याची लायकी नाही असे बोलत आईला आणि मला हातातील काठीने मयूर दोरगे यांनी प्लास्टिकच्या पाईपने तसेच सोन्या दोरगे यांनी हातातील असलेल्या दांड्याने मारहाण करीत असताना सुनिता दोरगे यांनी शिवीगाळी करून दमदाठी करत मला हाताने व लाथा बुक्क्यांनी मारहाण केलेली आहे.मला जीवे मारण्याची धमकी दिली आहे अशा स्वरूपाची फिर्याद यवत पोलिसात दिलेली आहे.
या प्रकाराने कुटुंब भयभीत झालेले असून छबुबाई या म्हाताऱ्या आजीची अवस्ता खराब झालेली आहे.
विशेष वाचा ::-::
यवत पोलिसात कोणाची लुडबूड?
यवत पोलिसात आर्थिक तड जोडीसाठी स्वताला पोलिस मित्र समजणारा मद्यस्थी करण्याचे काम करतो अशी चर्चा अनेक वर्षा पासून आहे.
या मारहाण प्रकरणी सुद्धा त्याने जीवाची बाजी लावण्याचं यशस्वी प्रयत्न केला मात्र अधिकारी नारायण देशमुख यांनी त्याची डाळ शिजू दिली नाही.अखेर गुन्हा दाखल केला गेला आहे.दिवसभर सोन्या पोलीस स्टेशनमध्ये गिरट्या घालत असतो कोणाला त्याचा संशय आल्यास तो फोनवरून बोलत असतो त्याची पोलीस स्टेशनमध्ये नक्की काय म्हणून ओळख आहे.हा प्रश्न अनेकांना पडला असला तरी मी पोलीस मित्र आहे अशा स्वरूपाची तो मेखी तो मिरवत असतो.
यवत परिसर याच्या लुडबुडीला वैतागला असून त्याला आवर कसा घालणार हा प्रश्न यवत पोलीस स्टेशनमध्ये येणाऱ्या प्रत्येकाला पडलेला असतो तरी पोलीस स्टेशनच्या मध्यस्थीने त्याचे सोन्याचे दिवस आलेले आहेत अशी टिंगल टवाळी येथे त्याला पाहणारे लोक करताना दिसत आहेत.



