दौंड:आवाज लोकशाहीचा
दौंड पुनर्वसन जमिनीच्या खरेदी विक्रीचा घोटाळा मोठा महाभयंकर असून त्याची सर्व पालेमुळे राजकारण्यांचा आशीर्वादामुळे महसूल खाते पुणे पुनर्वसन विभाग आणि दौंड तहसील कार्यालयामध्ये खोलवर रुजलेली आहेत.या सर्वांची बारकाईने आणि कसून प्रामाणिकपणाने चौकशी करावी अशा स्वरूपाची मागणी आता पुनर्वसित नागरिक करू लागले आहेत.
दौंड तालुक्यामध्ये पुनर्वसन जमीन विक्री आणि खरेदीसाठी एजटांचा सुळसुळाट झाला असून बऱ्यापैकी एजंट हे सत्तेतील नेतृत्वाचे बगलबच्चे आहेत अशा स्वरूपाची माहिती समोर येत आहे.जमिनीच्या माध्यमातून आपली लवकर भरभराटीचा नवा मार्ग या निमित्त यांनी शोधला असल्याने रोज उठून तलाठी ते तहसील कार्यालयांचे उंब्रे झिवत यांचा प्रवास पुणे येथील जिल्हा अधिकारी पुनर्वसन शाखे पर्यंत सुरू असतो.
दौंड तालुक्यात नेते मंडळी यांचे मार्गदर्शन लाभलेली जमीन लुटारूंनी आपली आपली टोळी निर्माण केलेली असून त्यात स्वतःला समाजसेवक समजणाऱ्या पत्रकारांनी सुधा उडी घेतली आहे.
पुनर्वसन जमिनींचे रेकॉर्ड आहे का?
जिल्हा पुनर्वसन विभागात मोठा सावळा गोंधळ निर्माण झाला असून आर्थिक मलिद्यासाठी या विभागात अनेक जमिनीचे वाटप एकाच व्यक्तीला एकच जमीन दोन तीन व्यक्तीला आयत्या स्वरूपाची खिरापत वाटावी तशी वाटप करण्यात आलेली आहे.यात मृत व्यक्तींना सुद्धा वाटप करण्यात आलेले असून काही स्थानिक गावकऱ्यांच्या नावावरती बोगस वाटप करण्यात आलेले आहे.
पुनर्वसन विभागातील हा सावळा गोंधळ प्रशासनातील वरिष्ठ वर्गासह कनिष्ठ वर्गातल्या शिपाया पर्यंत सर्वांना माहीत असून यावरती प्रामाणिकपणाने काम करणारा अद्याप दिसून आलेला नसल्याने या विभागात रोज कोणत्या ना कोणत्या खातेदाराला जमीन वाटपाचा दाखला अन्यथा विक्रीची परवानगी दिली जाते आणि या दरम्यानच्या काळामध्ये कागदांची मोठ्या प्रमाणात हेराफेरी केली जाते हे प्रमाण इतक्या मोठ्या प्रमाणात आहे की भोर हवेली आणि दौंड या तहसील कचेरी मध्ये या राजकीय पिढीत असलेल्या दलालांनी आपला अड्डा तयार केलेला आहे.
केडगाव परिसरामध्ये एका दलालाने आपल्याला अडचण येऊ नये म्हणून काही पत्रकार काही वरिष्ठ राजकारणी गाव पुढारी आणि अधिकारी यांच्याबरोबर सलगी केली असून रोज दौंड तहसील कचेरी तलाठी कार्यालय मंडल अधिकारी आणि जिल्हा पुनर्वसन विभागाकडे शासनाकडे नोकर असल्याप्रमाणे काम करीत आहे.
तो सध्या त्याच्याकडेच्या असलेल्या सर्वांचा सल्लागार झाला असून अशा स्वरूपाचे कामकाज दापोडी बोरिपार्धी,कडेठाण,वरवंड,यवत,पिंपळगाव,पाटससह दौंड मध्ये तर दलाल आणि त्याच्या हक्काची मोठी दहशतच आहे अशा स्वरूपाची ही टोळी काम करताना दौंड शहरातील पूर्व पट्ट्यात सुद्धा बोरवेल खोरवडी देऊळगाव आदी भागांमध्ये त्यांचे जाळे पसरलेले आहे.
दौंड शहरात मात्र या टोळीने धुमाकूळ घातल्याने आनेक गरीब कुटुंबांना त्याची झळ पोहचली आहे.जमिनी मिळाली कोणाला? आणि पैसे कमवले कोणी? हा प्रश्न या टोळीचा मुखवटा प्रामाणिक प्रशासनाने इमानदारीने चौकशी केल्यास फाटल्या शिवाय राहणार नाही अशी सद्या तालुक्यात वादळी चर्चा सुरू झाली आहे.
दौंड शहरात कोण हा स्टॅम्प विक्रेता आणि कोण नगरपालिकेचा सेवा निवृत्त अधिकारी याची माहिती सर्वश्रुत नागरिकांना झालेली असताना सुधा या दोघांच्या पाठीवर आक्काचा आशीर्वाद असल्याने कोणीच त्यांच्या बाबत तोंड उघडत नाही..
परिणामी या दोघांनीही प्रचंड माया जमवून आपली परस्थिती गब्बर केलेली आहे.यांची खातेनिहाय व गोपनीय चौकशी केल्यास दौंड शहरातील दलाल त्याचा
आणि त्यांच्या टोळीत असलेल्या सर्वच अलीबाबा चाळीस चोराची टोळी ही पोलीस खात्याची कायदेशीर शिकार झाल्याशिवाय राहणार नाही अशा स्वरूपाची चर्चा सध्या शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात सुरू असल्याने या प्रकरणाची पाळेमुळे महसूल विभगाच्या कार्यालयात आहेत या बाबत शंका नाही.



