पाटस:आवाज लोकशाहीचा
पाटस येथील आरोग्य उपकेंद्राच्या परिसरातच गटारीचे सांडपाणी अनेक दिवसांपासून उघड्यावर पसरत असल्याने परिसरात दुर्गंधी निर्माण झालेली आहे. विकासाच्या गप्पा मारणाऱ्या पाटस ग्रामपंचायतीच्या निष्काळजी धोरणामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे .
आपल्यावर कोणाचा तरी दबाव येऊ शकतो या मुळे तक्रार नेमकी कोणाकडे करायची हा प्रश्न नागरिकांना पडला आहे..
याबाबत माहीत अशी की पाटस- कानगाव रस्त्यावर पाटस गावच्या आरोग्य उपकेंद्राच्या समोरून अनेक ठिकाणची सांडपाणी जाणारी सिमेंट पाईपलाईन फुटली असल्याने ती उघडी पडली आहे.परिणामी या परिसरात घाणीचे साम्राज्य निर्माण झाले असल्याने मोठ्या प्रमाणावर दुर्गंधी पसरली गेली आहे.
याचा त्रास नागरिक महिला विद्यार्थी तर कानगाव येथून येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना होवू लागला आहे.
पाटस बाजार मैदान परिसरात व आरोग्य उपकेंद्र समोरच पाटस कानगाव रस्त्यालगतच असणाऱ्या नागेश्वर नगर,कोळपे वस्ती,योगेंद्र नगर या परिसरातून आलेली भुमीगत गटार लाईन ही उघड्यावर पडली असल्याने ते पाईप ठीक ठिकाणी दोन-तीन जागी फुटल्याने त्या ठिकाणी हे सांडपाणी साचले जात आहे.
परिणामी कित्येक वर्षे या परिसरात दुर्गंधी पसरली गेली असून पाटस कानगाव रस्त्यावर ये-जा करणाऱ्या नागरिकांना दुर्गंधी मूळे त्रास सहन करावा लागत आहे.मागील महिनाभरापासून ही गटर लाईन उघड्यावर आहे.तिची दुरुस्ती करून ते भूमिगत करावी अशी मागणी परिसरातील नागरिक अनेक दिवसांपासून ग्रामपंचायत प्रशासनाकडे करीत आहे.
मात्र राजकारणापाई आणि कोणत्या सुडा पोटी हे प्रशासन येथील नागरिकांच्या आरोग्याच्या जीवाशी खेळत असल्याचे चित्र असल्याने या प्रकाराकडे ग्रामपंचायत प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप नागरिक करीत आहे.
विशेष वाचा ::-::
या बाबत ग्रामविकास अधिकारी सयाजी क्षीरसागर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांचा संपर्क होऊ शकला नाही..
तर उघड्यावर असलेल्या गटार लाईनची दुरुस्ती होण्या बाबत वारंवार ग्रामपंचायतकडे तक्रार केल्या आहेत तर नुकचीच रविवार दि २६ जानेवारीच्या ग्रामसभेतही विषय मांडून दुरुस्तीचा ठराव करण्यात आला आहे.मात्र ठराव होऊनही अद्याप हे काम केले नसल्याची माहिती ग्रामस्थ सुधीर पानसरे यांनी दिली आहे..



