दौंड पुनर्वसन व्यवहारात बळी गेलेल्या ज्ञानदेव विठ्ठल शेंडे च काय झालं,?खरी माहिती उघडी करा..

दौंड:आवाज लोकशाहीचा

स्वर्गीय कलाकार निळू फुले यांचा सामना या नावाचा सिनेमा प्रख्यात झाला यामध्ये मारुती कांबळे यांचे काय झालं हे वाक्य प्रचंड लोक चर्चेचा विषय झाला तशाच स्वरूपाचा एक विषय दौंड शहरातील देव पाम या परिसरातील जमीन विक्री आणि बांधकाम या विषयाची सखोल आणि प्रामाणिकपणाने चौकशी केल्यास इथे मात्र ज्ञानदेव विठ्ठल शेंडे याचं काय झालं अशी म्हणण्याची वेळ आल्या शिवाय राहणार नाही अशा स्वरूपाची ठाम माहिती पुनर्वसन जमिनीच्या खरेदी-विक्री काम करणाऱ्या दौंड शहरातील टोळीच्या त्रासाला वैतागलेल्या कुटुंबाकडून दिली जात आहे.

दौंड शहरात देव पाम नावाचा विकासित झालेला एक परिसर आहे.हा परिसर ज्या जमिनीवर ती विकास झाला त्या जमिनीच्या व्यवहारातच मोठ्या प्रमाणात गौड बंगाल आहे.राजकीय शक्ती दलाल आणि त्यांच्या टोळीमुळे यातील प्रमुख घडामोडी अद्याप उजेडात आल्या नसून त्याच्यावरती कोणीही बोलण्यास तयार नाही.या देव पाम परिसराच्या विकास कामाच्या दरम्यान एकाचा मृत्यू झाला असून ज्ञानदेव विठ्ठल शेंडे असं संबंधिताचे नाव आहे.आणि या व्यक्तीचा या घडामोडीची काहीतरी संबंध आहे अशा स्वरूपाची चर्चा अलीकडच्या काळामध्ये जोरवलेली आहे.

“आवाज लोकशाहीचा”न्यूज मधून दौंड शहर आणि परिसरामध्ये पुनर्वसन जमिनीवरचा दलाल त्यांना मदत करणारा स्टॅम्प विक्रेता नगरपालिकेतील तो प्रशासकीय सध्या सेवानिवृत्त असलेला अधिकारी आणि त्यांच्या टोळीत काम करणाऱ्या सहकार्यांनी अनेक पुनर्वसन जमिनी धारकांना वेगवेगळ्या स्वरूपाने फसवणूक करून जमिनी लाटल्या आहे या स्वरूपाची मालिका सुरू आहे.वाचक वर्गामध्ये याचा प्रचंड चांगला पडसाद उमटल्यामुळे अजून नव्याने काही प्रसंग आता आवाज लोकशाहीच्या हाती येऊ लागलेली आहे.देव पाम हा त्यातील एक नवीन विषय असून देव पाम मध्ये जमिनीच्या बाबत गौडबंगाल आहे.

मात्र तिथे तयार झालेल्या इमारतींमध्ये सुद्धा नगरपालिके मधून चुकीच्या स्वरूपाची बांधकाम परवानगी देण्यात आलेली आहे.याच ठिकाणी ज्ञानदेव विठ्ठल शेंडे याचा बळी गेलेला आहे.हा बळी कोणत्या कारणावरून कशामुळे आणि कोणी घेतला याचा तपशील दौंड पोलीस स्टेशनमध्ये काही प्रमाणात उघड होऊ शकतो.मात्र त्या पलीकडे जाऊनही त्याच्या मृत्यूची चौकशी झाली पाहिजे होती अशा स्वरूपाची अपेक्षा पुनर्वसन जमिनीच्या बाबत ज्या लोकांची फसवणूक झालेल्या परिवाराकडून ही मागणी होऊ लागली आहे.

प्रख्यात सिने कलाकार स्वर्गीय निळूभाऊ फुले यांनी सामना पिक्चर मध्ये मारुती कांबळेचं काय झालं हे एक वाक्य एका चित्रपटातील कथेला अनुसरून केलं असल्याने ते वाक्य अतिशय लोकप्रिय झालं होतं अशा स्वरूपाची घटना सामना चित्रपटात होती पण खऱ्या अर्थाने दौंड शहरात घडलेला प्रसंग आहे.आणि म्हणून प्रामाणिक अधिकाऱ्यांनी मनापासून स्वच्छ प्रतिमेने या घडामोडीची चौकशी केल्यास ज्ञानदेव विठ्ठल शेंडे याचं नक्की काय झालं हा प्रश्न निर्माण होऊ शकतो आणि त्यासाठी शोध मोहीम राबवणार यांनी प्रामाणिक कार्य केल्यास यातून मोठा दौंड शहरांमध्ये देव पाम या परिसरातील जमीन विक्रीचा घोटाळा बाहेर येऊ शकतो अशा स्वरूपाचा ठाम विश्वासही हे परिवार व्यक्त करीत आहे.

शेंडे यांचा बळी गेलेला असलेला परिसर नगरपालिकेतील बांधकाम विभागाने सुद्धा इमारतींना गैरमार्गाने परवानगी देऊन विकास करण्यास हातभार लावलेला आहे.या परिसरामध्ये राहणाऱ्यांसाठी हा निवारा जरी झाला असला तरी शेंड्यांच्या मृत्यूचं कारण या परिसरातील झालेला विकास ठरलेला आहे असे सुद्धा या परिवारांचे मत आहे.

जमिनी विक्री व्यवसायाच्या कार्य प्रणालीमध्ये पुण्यावरून दौंड मध्ये येऊन पुनर्वसन जमिनीवर ती आपली वक्रदृष्टी करीत अनेक गोरगरीब लोकांच्या जमिनी बळकवण्याचं पाप कोणी व्यक्ती करतो आणि त्याला दौंड शहरांमध्ये राजकीय आश्रय मिळतो त्याला एक आली बाबा चाळीस चोरांची टोळी भेटते आणि जे काही घडतं ते सर्व काही विचित्र स्वरूपाचा आहे.

यातून अनेक परिवार पीडित झालेला आहे.या टोळीमुळे वैतागलेला आहे. त्यांच्या जीवन प्रवासामध्ये या टोळीचा प्रचंड मोठा त्रासदायक म्हणावा लागेल अशा स्वरूपाची पुनर्वसन जमिनीची हकीकत नुसत्या दौंड शहराला बाधित करणारी नसून ग्रामीण भागातही याची मुळे खोलवर गेलेले आहेत..

यामध्ये काही दलाल केडगाव परिसरात वरवंड परिसरात कडेठाण हातवळण यवत पिपळगाव राहू सहजपूर नांदूर या भागांमध्ये पसरलेले आहेत.या सर्वांना राजकीय आशीर्वाद मिळत असल्याने दौंड तालुक्यात अनेक पुनर्वसन जमिनीच्या बोगस नोंदी खरेदी-विक्री झालेले आहेत या सर्व पुनर्वसन जमिनीच्या वाटपासह आज पर्यंतच्या परवानग्या विक्री याची माहिती सखोल पणे जाहीर रीत्या नागरिकांना मिळाली पाहिजे अशी माफक अपेक्षा सुद्धा हे पीडित परिवार करू लागले आहेत..