दौंड गट विकास अधिकारी प्रशांत काळे व आरोग्य विभागाच्या पत्राला पाटस ग्रामपंचायत प्रशासनाकडून केराची टोपली |

दौंड:आवाज लोकशाहीचा

पाटस ग्रामपंचायत प्रशासन घाण प्लास्टिक कचरा व्यवस्थापन डेपो मध्ये कचरा जाळून जागीच नष्ट करत असल्याने दौंड पंचायत समितीचे गट विकास अधिकारी प्रशांत काळे व दौंड आरोग्य विभाग यांनी पाटस ग्रामपंचायतिने पाठवलेल्या पत्राला केराची टोपली दाखवली आहे.

पाटस-दौंड अष्टविनायक रोड लागत असलेल्या कचरा व्यवस्थापन डेपो जवळ ग्रामपंचायत प्रशासनाकडून गावातील कचरा घाण,प्लास्टिकचा कचरा आणून टाकला जातो आणि त्याच ठिकाणी तो जागी जाळून नष्ट करण्याचा सपाटा मागील महिन्या भरापासून लावला आहे.

परिणामी अंबिका नगर,नागेश्वर मंदिर परिसर रोहिदास नगर या भागात मोठ्या प्रमाणावर दुर्गंधी पसरली आहे.येथे जाळण्यात आलेल्या कचऱ्याचे धुराचे लोट हवेत जाऊन ते मानवी वस्तीत जात आहे यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

याबाबत स्थानिक विधितज्ञ व सामाजिक कार्यकर्ते रणजित भंडलकर यांनी दौंड पंचायत समितीचे गट विकास अधिकारी, दौंड तालुका आरोग्य अधिकारी व प्रदूषण महामंडळाकडे लेखी तक्रार केली होती.

या तक्रारीनंतर दौंड आरोग्य विभागाच्या आरोग्य अधिकारी डॉ उज्वला जाधव यांनी वरवंड प्राथमिक आरोग्य केंद्राच्या आरोग्य विभागाच्या पथकाला त्या ठिकाणी जाऊन प्रत्यक्षात पाहणी करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले असताना.प्राथमिक आरोग्य केंद्राच्या आरोग्य अधिकारी डॉ शिवराणी पांचाळ यांनी कचरा व्यवस्थापन डेपो मध्ये ठिकाणी जाऊन पाहाणी केली असता त्या ठिकाणी उघड्यावर कचरा टाकुन तो जाळला असल्याचे प्रथमदर्शनी निदर्शनास असताना त्या ठिकाणच्या परिसरातील नागरिकांची आरोग्य तपासणी करत चर्चा केली असता अनेक नागरिकांना साथीचे रोग असल्याचे दिसून आले. त्यानुसार आरोग्य विभागाने ग्रामपंचायत हद्दीतील कचरा डेपो च्या मध्ये कचरा टाकण्याची कार्यवाही केली जात नसल्याचे दिसुन येत आहे.

या ठिकाणी राहणा-या कुटुंबाचे आरोग्य सर्व्हेक्षण केले असता साथ रोग उद्रेक होण्याची शक्यता नाकरता येत नाही.तरी आरोग्यांस दृष्टीने उपाय योजना करणेत येऊन केलेल्या कार्यवाही करावी असे पत्र ग्रामपंचायत प्रशासनाला दिले होते. दौंड पंचायत समितीचे गट विकास अधिकारी प्रशांत काळे यांनीही पाटस ग्रामपंचायतला संदर्भात पत्रव्यवहार केला होता.

मात्र आद्यपही ग्रामपंचायत प्रशासनाकडून कोणतीच दखल घेतली नसल्याचे चित्र आहे. या ठिकाणी कचरा व्यवस्थापन डेपोच्या बाहेर कचरा टाकला जात असून तो जाळण्याचा प्रकार सुरूच असून नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण होत आहे.

हा डेपो या परिसरातुन हलवण्याचा ठराव ही ग्रामसभेत झाला होता मात्र काही राजकीय गाव पुढाऱ्यांकडून राजकारण केले जात आहे.नागरिकांच्या आरोग्याचा खेळ ग्रामपंचायत प्रशासन करीत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

याबाबत दौंड पंचायत समितीचे गट विकास अधिकारी प्रशांत काळे विचारले असता अशी माहिती दिली की,पाटस ग्रामपंचायतचे ग्राम विकास अधिकारी यांना नोटीस बजावली असून दौंड पंचायत समिती कार्यालयात तात्काळ हजर राहून काय कारवाई केली ? या संदर्भात अहवाल सादर करण्यासाठी बोलवले आहे..