दौंड मधीलपुनर्वसन जमीन टोळीने ऐका डॉक्टरला सुधा फसवले ?

आवाज लोकशाहीचा
दौंड प्रतिनिधी….दौंड शहरात पुनर्वसन जमिनीवर गब्बर झालेल्या टोळीने अनेक जमीन धारकांची फसवनुक केलीच आहे मात्र बोगस जमिनी विकून डॉक्टरची फसवणूक केलेली आहे,जमिनीची न्यायालयात केस असून गेली १६ वर्ष जागेचा प्रश्न शिवाजी नगर पुणे येथील कोर्टात आहे
ज्याची फसवणूक करण्यात आली ते डॉक्टर टोळीच्या दबाव पोटी गप्प बसले असले तरी त्याच्या हॉस्पिटल असणाऱ्या जागेचे मोठे गौडबंगाल आहे ,
जमीन मालक मूळचा वेगळा असून दलाल याने आपले सरकारी दरबारी वजन वापरून ऐका महिलेच्या नावावर केली ,मूळ मालक अंधारातच राहिला ,नावावर केलेल्या महिलेला सुद्धा फसवल आणि भलत्याच व्यक्तीने  डॉक्टरला विकली असा मोठा गोंधळ आहे,

,याबाबत अधिक मिळालेली माहिती अशी की दौंड मधेच  ऐका व्यक्तीला  मिळालेली जमीन होती,पुनर्वसन दलाल याने या जमीन वरती पडद्याआडून एक महिलेला जमिनीत मालक म्हणून घुसवले  याला तत्कालीन मंडल अधिकारी आणि तलाठी सामील होते

मूळ मालकाच्या लक्षात आली आणि खेळ सुरू झाला   साधारण २०११ मधे घडली आहे.जमीन मालक याला हे समजल्यावर त्याने प्रथम विभागीय अधिकारी (प्रांत) यांच्या कडे अपील केले  महिलेचे लागलेले नाव रद्द व्हावे म्हणून प्रयत्न केले

राजकीय आशीर्वाद असलेल्या या दलालाने प्रांत कार्यालयातील निकाल व्यवस्थित हाताळून महिलेच्या नावाने करून घेतला हा सरळ आरोप मूळ जमिंन मालक याच्या परिवाराने केलेला आहे .
आपल्या विरोधात निकाल गेल्यावर मूळ मालक याने प्रांत यांच्या निकालावर आपिल केले तो ही निकाल विरोधात गेला पुढे त्यांनी आयुक्त कार्यालयात आपील केले तो सुद्धा विरोधात गेला शेवटी त्यांनी उच्च न्यायालय मुंबई येथे अपिल केले मात्र न्यायालयाने त्यांना हा दिवाणी दावा असल्याकारणाने आपण खालच्या कोर्टात दाखल करावा अशा सूचना केल्यावर ती त्यांनी शिवाजीनगर कोर्टात येथे हा दावा दाखल केलेला आहे तो आज ही चालू आहे


दरम्यानच्या काळामध्ये ज्या महिलेच्या नावावरती जमीन केलेली होती तिच्या कडून आपल्यासह काही मित्रांच्या नावाने करून घेतले सद्य न्यायालयात महिला जात नसून दलाल जातो आहे अशी माहिती पीडित परिवाराने दिलेली आहे ,
हा सर्व प्रकार जमिनी साठी घोटाळ्याचा असला तरी त्या जमिनीवर आज वेगळाच व्यक्ती मालक असून त्याची इमारत उभी आहे आणि ती व्यक्ती डॉक्टर आहे अशी माहीत हाती आलेली आहे ,
सद्या शहरात पुनर्वसन जमिनीच्या आणेक भानगडी समोर येऊ लागल्या असून तालुक्यात पुनर्वसन जमीन घोटाळा मोठा उघड होण्याची लक्षणे दिसू लागली आहेत

वाचा…..पुनर्वसन जमिनीच्या दस्त बनवण्यासाठी एकच यांच्या टोळीतील व्यक्ती काम करतो तो प्रसिद्ध झालेला आहे त्याचीविक्रेता म्हणून ओलखल जाते

या जागेवर इमारती बांधकामाची पालिकेची परवानगी लागल्यास स्वतःला अधिकारी समजणाऱ्या आज सेवा निवृत्त झालेला ऐक अधिकारी होता त्याने उलट सुलट परवानगी दिल्या आहेत मात्र आपले हात चांगलेच ओले केले आहेत …..कर म्हणून ओळखले जाते