दौंड:आवाज लोकशाहीचा
पुनर्वसन जमिनीच्या भूमाफिया दलाल ला सांभाळणारा आका आणि त्याची टोळी ही एकमेकांना किती जपते त्या साठी काय काय करते याचा खरा प्रकार उघड करायचा असल्यास १५ डिसेंबर २०२३ ला दौंड शहरात रात्री दहा च्या दरम्यान घडलेल्या प्रंसगाची एस.आय.टी चौकशी करा पुनर्वसन जमिनी विक्री खरेदी प्रकरणातील मोठा घोटाळा समोर येऊन उघड होऊन घोटाळ्याचे कारभारी म्हणून दलाला सह त्याच्या टोळीचा बुरखा फाटला जाईल अशी संतप्त प्रतिक्रिया यांच्या त्रसाने पीडित झालेला परिवार देत आहे.
टोळीत पोलीस अधिकारी नगरपालिकेचा अधिकारी महसूल चे पुनर्वसन कारभारी तलाठी मंडल अधिकारी नगरसेवक आका त्याला आशीर्वाद देणारा मोठा आका असल्याने सर्वसामान्य जमीन मालकांना न्याय मिळणे अवघड होऊन बसले आहे.
परिणामी जमीन मालक पीडित होउन त्रस्त आणि जमिनी खोट्या नाट्य प्रकरणे करून लूट करणारी टोळी एकदम मस्त झालेली आहे.त्यांच्या त्रासाला कंटाळून एका शेतकऱ्याने आपल्या न्याय हक्कासाठी घेतलेला पवित्रा म्हणून तो प्रसंग घडला होता.
पोलिसान एरवी गावठी कट्टा घेऊन शहरात व्यक्ती येतोय अशी खबर जरी मिळाली तरी सापळा लावून त्याला अटक करतात त्याच्या सह पत्रकारांना माहिती देऊन प्रसिद्धी मिळवतात मात्र अनेक तरुण बाहेर जिल्ह्यातून येतात गाण्याच्या तालावर कंबरेला कट्टे लावून शहरात दहशत करून जातात सर्व शहरात याचा गाजावाजा होतो नागरिकांच्या काहीं काळ दहशत निर्माण होते.पोलीस मात्र गांधीजींच्या तीन माकडांच्या भूमिकेत राहतात ही बाबा मोठी गंभीर म्हणावी लागेल.
या घटनेची सखोल चौकशी केल्यास या टोळीचा आणि यांनी साथ देणाऱ्या तत्कालीन पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेचा बुरखा फाटला शिवाय राहणार नाही अशी संतप्त प्रतिक्रिया यांच्या त्रासाने पीडित झालेला परिवार देतो आहे.
दौंड-पाटस ओरडू लागत असलेल्या पुनर्वसन जमिनी बाबत घडलेला तो प्रसंग यांच्या कारभार बाबत बरेच काही सांगणारा आहे.मात्र त्याची सखोल चौकशी झाली पाहिजे अशी मागणी ते करू लागले आहेत.
विशेष वाचा
शहरात नगर पालिकेतील सद्या सेवानिवृत्त झालेल्या एका अधिकाऱ्याने यांच्याच टोळीचा गैरफायदा घेऊन बांधकाम व्यवसायिक यांना कोंडीत पकडुन काही ठिकाणी सदनिका,काही ठिकाणी जमिनीचे मोकळे भूखंड मलिदा म्हणून मिळवले आहेत.
एक डॉक्टरचा दवाखाना यांच्याच टोळीच्या एका शिलेदारामुळे अडचणीत आला असून त्याच्या दवाखान्याची जागाच अन्य कोणाच्या तरी नावावर आहे.मी सुद्धा जमीन या दलालांनी लुटून तिचा विक्री व्यवसाय केला आहे अशा स्वरूपाची मोठी चर्चा आहे..
या दवाखान्या बाबत वाचा उद्या आवाज लोकशाहीचा



