दौंड तालुक्यातील शेतकऱ्यांचा तयार होणार फार्मर आयडी- तहसीलदार अरुण शेलार यांची माहिती..

दौंड:आवाज लोकशाहीचा

महाराष्ट्र शासनाच्या महत्वकांक्षी असलेला प्रकल्प अ‍ॅग्रीस्टॅक योजने अंतर्गत प्रत्येक शेतकऱ्याचा फार्मर आयडी बनविण्याच्या कार्यक्रम सुरू झाला आहे.यामध्ये शेतकरी, महा ई सेवा केंद्र,आपले सरकार केंद्र,ग्राहक सुविधा केंद्र ( सीएससी ), ग्राम महसूल अधिकारी तलाठी ,कृषि अधिकारी,ग्राम विकास अधिकारी व ग्रामसेवक यांचेव्दारे हे रजिस्ट्रेशन शेतकऱ्यांना करता येणार आहे असल्याची माहिती दौंड तहसीलदार अरुण शेलार यांनी दिली आहे..

अ‍ॅग्रीस्टॅकयोजने अंतर्गत प्रत्येक शेतकऱ्याचा फार्मर आयडी बनवण्यासाठी च्या सर्व समावेशक प्रशिक्षण दौंड तहसिल कार्यालय मीटिंग हॉल मध्ये शुक्रवार दि२४ रोजी कार्यक्रम पार पडला गेला आहे..

यावेळी दौंड उपविभागीय अधिकारी मिनाज मुल्ला,दौंड तहसिलदार अरुण शेलार,गट विकास अधिकारी,तालुका कृषि अधिकारी,तालुक्यातील सर्व मंडल अधिकारी,सर्व ग्राम महसूल अधिकारी,ग्रामसेवक,कृषि अधिकारी,महा ई सेवा केंद्र चालक,आपले सरकार केंद्र चालक,ग्राहक सुविधा केंद्र चालक उपस्थित होते.

नायब तहसिलदार तुषार बोरकर यांनी प्रशिक्षण व प्रात्याक्षिक करून दाखविले. रविवार दि२६ रोजी तालुक्यातील १६ मंडल अधिकारी मुख्यालयी सर्व संबंधित शासकीय यंत्रणेच्या उपस्थितीत अ‍ॅग्रीस्टॅक रजिस्ट्रेशन कॅम्पचे आयोजन करण्यात आले असल्याने याचा जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा.असे आवाहन करण्यात आले आहे.

या रजिस्ट्रेशन करीता शेतकऱ्याचा आधार क्रमांक व आधार शी लिंक केलेला मोबाईल नंबर तसेच आपल्या शेतीचे गट क्रमांक याची माहिती आवश्यक आहे. रजिस्ट्रेशन करताना शेतकऱ्याला युनिक फार्मर आयडी मिळणार आहे.त्यांच्या सर्व शेतीची माहिती एकत्रित होणार आहे.तसेच शासनाच्या विविध योजना उदा. पीक विमा, पीएम किसान व इतर अनुदान यांचा लाभ शेतकऱ्यांना घेताना मदत होणार असल्याची माहिती तहसीलदार अरुण शेलार यांनी दिली आहे..