दौंड:आवाज लोकशाहीचा
पुनर्वसन जमीनीचा दलाल आणि त्याच्या आका चा राजकीय वरदस्त मजबूत असल्याने पोलीस प्रशासन सुद्धा डोळे मिटून गप्प बसते का? असा प्रश्न १५ डिसेंबर २०२३ मध्ये दौंड शहरात घडलेल्या प्रकरणावरून दिसून आला आहे.
दौंड शहरात या प्रकरणाने काही क्षणातच दहशतीचे वातावरण निर्माण केले होते.पुनर्वसन जमिनीच्या खरेदी-विक्री प्रकरणातील वादातून सातारा येथील काही तरुण रात्री साडे दहाच्या सुमारास शहरातील नामवंत असलेल्या व्यक्तीच्या घरात आणि ऑफिसात देशी कट्ट्यासह घुसले होते.
याची सविस्तर माहिती शहरातील बहुतांश सर्वच नागरिकांना समजल्यावर पोलिसांना सुधा समजली होती.दुसऱ्या दिवशी वृत्तपत्रांमधून सुधा बातमी प्रकाशित झालेली होती.
देशी कट्ट्यास आलेल्या तरुणांनी शहरांमध्ये काही काळ तणावाचे वातावरण निर्माण करून सुद्धा दौंड पोलिसातील तत्कालीन अधिकारी भाऊसाहेब पाटील यांच्याकडून साधी फिर्याद सुद्धा दाखल झालेली नव्हती ही बाब अत्यंत गंभीर म्हणावी लागेल,
तरुण कट्टे घेऊन येतात शहरात घुसतात कार्यालयात जातात मोठ्या आवाजात गाणी लावून धिंगाणा घालतात हा सर्व प्रकार शहरातील अनेकांनी पाहिलेला असताना सुद्धा दौंड शहराच्या कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न म्हणून पोलीस विभागाने याकडे गांभीर्याने पाहिलेले नाही हाच प्रश्न पोलिसांच्या कार्यप्रणालीला काळिंबा लावणारा ठरतो असे म्हणल्यास चुकीचे ठरणार नाही.
मात्र या सर्वाच्या पाठीमागे शहरातील आका शी राजकीय ताकद होती असे स्पष्टपणे नमूद केल्यास गैर काय?एरवी सार्वजनिक ठिकाणी शांतता भंग झाल्यास अनेक निष्पाप लोकांवर कारवाई करणारे पोलीस प्रशासन साताराहून आलेल्या या शस्त्रधारी तरुणांवरती कुठलीच कारवाई का? करू शकले नाही,हा खऱ्या अर्थाने संशोधनाचा भाग असला तरी या तरुणांनी केलेला सर्व हैदोस हा पुनर्वसन जमिनीच्या प्रकरणातील होता आणि या प्रकरणांमध्ये दलाल आणि त्याचा आका आणि अन्य साथीदार यांचा सहभाग असल्याने हे घडलेले प्रकरण पोलीस दप्तरी नोंद होऊ नये आणि यातून जमीन विषयाची भानगड उघडी होऊन सर्वांची बदनामी होऊ नये याचीच काळजी घेण्यात आलेली होती.
अशा स्वरूपाची ठामपणाने चर्चा दौंड शहरतील नागरिकांनी त्यावेळी झालेली होती.गावठी कट्ट्यास आलेल्या तरुणांना पोलीस प्रशासनाकडून क्लीन चीट दिली गेली असली तरी सध्या या आकाच्या आणि त्यांच्या टोळीच्या माध्यमातून घडलेल्या अनेक गरीब पुनर्वसित जमीन धारकांना सुद्धा आपल्या तक्रारी पोलिसा देता येत नाहीत आणि पोलिसांकडूनही त्यांना मदत होत नाही,अशा स्वरूपाची माहिती यांच्या त्रासात वैतागलेल्या पुनर्वशीत जमीन मालकांकडून मिळत आहे.
सद्या या टोळीकडून पुनर्वसन जमिनी बाबत अनेक घोटाळे झालेले आहेत त्यांच्या आकां मुळे यांना वाचा फुटत नाही चिरीमिरी घेऊन प्रशासन तोंडत बोळा कोंबून मुक झालेले आहे.त्यांच्या भूमिकेने मात्र अनेक पीडित कुटुंबे मरण यताना भोगत आहेत.
विशेष वाचा
दौंड नगरपालिकेत बांधकाम व्यवसायिकांना चुना लावून या टोळीचा फायदा तत्कालीन इंजिनीयर नसताना इंजिनियर ची भूमिका बजावत काम करणाऱ्या एका सरकारी नोकरदाराने घेतला आहे.त्यांनी व्यवसायिकांचे काही भूखंड आणि काही बांधकामांमध्ये स्वतःसाठी प्रॉपर्टी कमावलेली आहे.अशा स्वरूपाची मोठी चर्चा राजरोसपणे होताना दिसत आहे.



