उच्च ध्येय गाठण्यासाठी संस्काराचा पाया असणे गरजेचे – संतोष परदेशी
पाटस:आवाज लोकशाहीचा
आई वडील आणि आपल्या गुरुजनांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून सकारात्मक विचार करा.उच्च ध्येय गाठण्यासाठी संस्कारांची गरज असते.अवांतर वाचनाची आवड निर्माण करून महान व्यक्तींची आत्मचरित्रे अभ्यासा शालेय जीवनात चांगल्या सवयी लावा.आपल्या शाळेचे,आई-वडिलांचे नाव मोठे करण्यासाठी प्रयत्न करा.प्रयत्न,जिद्द,चिकाटी,कठोर परिश्रमाच्या जोरावर यश नक्की मिळते असे मार्गदर्शन व्याख्याते संतोष परदेशी यांनी विद्यार्थ्यांना केले आहे..
वरवंड ता.दौंड येथील एकनाथ सिताराम दिवेकर महाविद्यालय चा एन.एस.एस.हिवाळी शिबिर नारायण बेट येथे आयोजित करण्यात आले होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रा.से.यो.कार्यक्रम अधिकारी प्रा.डॉ. नानासाहेब गोफणे होते,या शबिरातील व्याख्यान कार्यक्रमांत निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळ महाराष्ट्र राज्याचे कार्याध्यक्ष संतोष परदेशी बोलत होते.
पुढे ते म्हणाले की, प्रयत्नवादी रहा. चारित्र्य,नम्रता हे गुण आपल्या जवळ सतत बाळगा.थोर व्यक्तींचे आत्मचरित्र अभ्यासा आपल्याला ते अधिकची प्रेरणा देतील.पर्यावरण वाचवण्यासाठी सर्वांचा सहभाग महत्वाचा आहे.तसेच वृक्ष लागवड करून त्याचे संगोपन करणे काळाची गरज आहे.सध्या आरोग्याच्या समस्या जाणवत आहेत.त्यावर उपाय म्हणून पर्यावरण वाचवणे गरजेचे आहे.आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने प्रत्येकाने वृक्ष लागवड करण्याचे आवाहन त्यांनी केले.
यावेळी प्रा.डॉ.दत्तात्रय दुर्गाडे,प्रा.डॉ.ज्योती माने,ममता परदेशी,प्रा.भारत उगाडे,प्रा.हरसुले अपूर्वा,प्रा.शेळके दामाजी,दत्तात्रय गायकवाड इत्यादी मान्यवर उपस्थित होते.



