दौंड मधे पुनर्वसन जमिनीच्या दलालाला आशीर्वाद देणारा कोण?

आवाज लोकशाहीचा
दौंड प्रतिनिधी

दौंड शहरातील राजकीय आकाच्या मदतीने पुनर्वसन जमिनीच्या दलालाने आणि त्याच्या टोळीने धुमाकूळ घातला असून याचा विपरीत परिणाम पुनर्वसित झालेल्या गोरगरीब जमीन मालकांवर झालेला आहे.या दलालाने अशा गरीब जमीन मालकांच्या जमिनीची फसवणूक करण्याच्या उद्देशाने कोणाचे खरेदीखत कोणाचे बिन ताबा साठेखत तर कोणाचे कुलमुखत्यार पत्र करून घेताना कोणाचाही आर्थिक व्यवहार पूर्ण केलेला नाही असा आरोप ज्यांना हा त्रास झालं तो परिवार करीत आहे..

शहरात या घटना सुमारे २० वर्षापूर्वी या दलालाने सुरू केल्या असून अद्याप त्याच्या आणि त्याला आशीर्वाद देणाऱ्या आकाच्या त्रासाने अनेक कुटुंब उध्वस्त झालेली आहेत.दलाला मिळालेला आकाच्या आशीर्वादाचा राजकीय पटलावरती धबधबा असल्याने या सर्व पिढीत जमीन मालकांना शासन दरबारी सुद्धा न्याय मिळू शकलेला नाही ही वस्तुनिष्ठ परिस्थिती त्यांच्याशी बातचीत केली असता समोर आल्याशिवाय राहत नाही.

दौंड शहरांमध्ये या जमिनी बाबत २५ जुलै २००६ रोजी पहिली तक्रार दौंड मंडल आधिकारी यांच्याकडे झालेली होती.पुनर्वसन आर आर ६११ / ८९ दिनांक १२/९/८९ या जमीन विक्री परवानगीच्या आदेशातील अटी शर्तीचा अभंग झालेला आहे..

याची सविस्तर स्वरूपाची तक्रार करण्यात आलेली होती तक्रारीच्या अनुषंगाने प्रशासनाला योग्य ती माहिती देण्यात आलेली होती मात्र राजकीय धबधबा असणाऱ्या आका ने आपल्या भल्यासाठी या दलाला राजकीय ताकद देऊन तक्रार मोडीत काढण्यात आली.

२० नोव्हेंबर २००७ या काळात बिंनताबा साठेखत पुनर्वसीत जमीन मालकाकडून या दलालाने करून घेतले आज या घटनेला १७ वर्ष उलटली असून मूळ जमीन मालकाच्या ताब्यातच असून तिचे दोन वेळा खरेदीखत झाल्याचे संबंधित जमीन मालक सांगत आहेत जमिनीचे बिन ताबा साठी खत करून देणाऱ्यांनी खरेदीखताला गेलोच नव्हतो मग ते झाले कसे हा प्रश्न उपस्थित केलेला आहे.

हा प्रकार एवढाच नसून खरेदीखत झाल्यानंतर ती जमीन परत वेगळ्या व्यक्तीला खरेदीखताने देण्यात आलेली आहे असे असले तरी ताबा मात्र मूळ पुनर्वसित मालक यांच्याकडेच आहे हा सर्व प्रकार प्रामाणिकपणे प्रशासनाने शोधल्यास यातील मूळ घोटाळा बाहेर येऊन दलाल आणि त्याचा आका  त्यांचे सहकारी अडचणीत आल्याशिवाय राहणार नाही त
अशा प्रकारची अनेक प्रकरणे शहरातील पुनर्वसित जमिनी बाबत झालेली असून राजकीय दाबापोटी ही सर्व प्रकरणे सध्या व्यवस्थितरित्या शासनाच्या चौकटीमध्ये तयार झाली आहेत असेच भासवण्यात येते..

दौंड तालुका हा पुनर्वसित जमिनीच्या साठी प्रशासनाला कामधेनू विषय झालेला आहे रोकडा नगत या जमिनीच्या कागदपत्रांसाठी दलालांकडून मिळत असल्याने याबाबतच्या चुका प्रशासन प्रामाणिकपणाने लपवून कामकाज करीत असते अशी तक्रार जमीन मालकांना याचा त्रास होतो आहे त्यांच्याकडून होत आहे.

दौंड तालुक्यामधील पुनर्वसन जमिनी संदर्भात आज पर्यंत झालेल्या सर्व कामकाजांबाबत जन सुनावणी घेऊन त्या प्रकरणाची वस्तुनिष्ठ माहिती समोर आयावी अशा स्वरूपाची अपेक्षा या पीडित कुटुंबांची आहे.

दौंड मध्ये पुनर्वस्तीत जमिनीचे कामकाज करणारा त्याला पुण्यासारख्या शहरात राहत असला तरी दौंड शहरातील त्याचा आकार आणि त्यांचे बगलबच्चे ही त्याची ताकद आहे अशा स्वरूपाची तक्रार सुद्धा पीडित कुटुंब राजरसपणे करू लागले आहे.या टोळीतील एक स्टॅम्प विक्रेता मोठा माला माला झाला कसा याची चौकशी केल्यास या प्रकारनात  दूध का दूध आणि पाणी का पाणी झाल्या शिवाय राहणार नाही अशी ग्वाही हे परिवार देऊ लागले आहेत .त्यांच्या या ग्वाही मूळे कोण ,हा स्टॅम्प वाला याची चर्चा जोर धरत आहे .