आवाज लोकशाहीचा
पाटस:प्रतिनिधी
वरवंड ग्रामशिक्षण संस्थेचे एकनाथ सीताराम दिवेकर महाविद्यालयाच्या वतीने राष्ट्रीय सेवा योजना विशेष श्रमसंस्कार शिबिर १५ जानेवारी ते २१ जानेवारी २०२५ या कालावधीत देऊळगाव गाडा (ता. दौंड) येथील नारायण बेट या ठिकाणी आयोजित करण्यात आले आहे.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांच्या वतीने देऊळगावगाडा येथे एकनाथ सीताराम दिवेकर महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजना श्रमसंस्कार शिबिर उत्साहात पार पडले गेले आहे.या शिबिराचे उद्घाटन संस्थेचे विश्वस्त आदरणीय अंकुश दिवेकर यांच्या हस्ते दीपप्रज्वलन व प्रतिमा पूजन करून करण्यात आले.
यावेळी देऊळगावगाडा तंटामुक्तीचे अध्यक्ष दत्तात्रय शितोळे,ग्रामपंचायत सदस्य राजवर्धन जगताप,माजी सरपंच दत्तात्रय बारवकर,ह.भ.प. भगवान पवार,नवातात्या मोरे,प्राचार्य डॉ.अनिल शितोळे,उपप्राचार्य डॉ. शरद गाडेकर,कार्यालयीन अधीक्षक मोहन जाधव,प्रा.डॉ.दिलीप घुले, प्रा.दत्ता रेवडकर,ग्रंथपाल प्रा. तुळजाराम खैरे उपस्थित होते..
यावेळी राजवर्धन जगताप व दत्तात्रय बारवकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून शुभेच्छा दिल्या.उपप्राचार्य डॉ. शरद गाडेकर यांनी विद्यार्थ्यांना राष्ट्रीय सेवा योजनाविषयी माहिती दिली. कार्यक्रम अधिकारी डॉ.दत्तात्रय दुर्गाडे यांनी प्रास्ताविक करून शिबिरा दरम्यान आयोजित केलेल्या उपक्रमांविषयी माहिती दिली.यावेळी प्रा.डॉ.नानासाहेब गोफणे यांनी आभार मानले.
सूत्रसंचालन कार्यक्रम अधिकारी डॉ. ज्योती माने यांनी केले. यावेळी राष्ट्रीय सेवा योजना समितीतील प्रा. भारत उगाडे, प्रा. दामाजीपंत शेळके,प्रा. दिव्या रोकडे,प्रा.धनश्री बारवकर,प्रा. स्नेहल दिवेकर,प्रा.अपूर्वा हरसुले, दत्तात्रय गायकवाड उपस्थित होते



