इस्लामपूरच्या सद्गुरूआश्रमशाळेत विद्यार्थ्याना कायद्याचे धडे…


कायदेशीर साक्षरता काळाची गरज

आवाज लोकशाहीचा:इस्लामपूर
विशेष प्रतिनिधी:आष्पाक आत्तार

इस्लामपूर येथील सद्गुरु आश्रमशाळेच्या विद्यार्थ्यांना कायद्याचे धडे देण्यात आले.गुड टच बॅड टच,सायबर क्राईम डिजिटल अरेस्ट, बालविवाह,पोक्सो कायदा,सायबर गुन्हेगारांच्या जाळ्यात अडकू नये यासाठी कोणत्या दक्षता घ्यायच्या अशा अनेक कायदेशीर बाबींची विद्यार्थ्यांना माहिती देऊन जनजागृती करण्यात आली.

बालकांवर होणारे अत्याचार रोखण्यासाठी पोक्सो कायद्यातील तरतुदींची कठोर अंमलबजावणी होणे गरजेचे आहे असे प्रतिपादन यावेळी आंतरराष्ट्रीय कायदेतज्ञ परिषदेचे सदस्य केदार भोई यांनी केले.

कायदा समजून घेताना या विषयावर त्यांनी तसेच कोल्हापूर जिल्हा व सत्र न्यायालयाच्या विधितज्ञ अश्विनी जाधव,फर्ग्युसन विधी महाविद्यालयाच्या पूजा निगडे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

बालकांना संरक्षण देण्याच्या उद्देशाने २०१२ मध्ये पोक्सो कायदा अस्तित्वात आला.बालकांवर होणारे अत्याचार रोखण्यासाठी या कायद्यात फाशीच्या शिक्षेची ही तरतूद करण्यात आली आहे.याची जाणीव भोई यांनी सर्वांना करून दिली.सायबर क्राईम,डिजिटल अरेस्ट,मोबाईलचा वापर कसा करावा कोणत्या गोष्टी करू नयेत,काही ॲपच्या माध्यमातून आपण असुरक्षित कसे होतो याविषयी सखोल माहिती त्यांनी विद्यार्थी तसेच उपस्थितांना करून दिली.

ॲड अश्विनी जाधव यांनी महिलांवरील अत्याचार,कौटुंबिक हिंसाचार,बालविवाह यापासून प्रतिबंध करणाऱ्या कायद्याची माहिती दिली.

पूजा निगडे यांनी गुड टच आणि बॅड टच म्हणजे काय व त्यापासून विद्यार्थिनींनी आपले संरक्षण कसे करावे याबाबत मार्गदर्शन केले.

सुरुवातीला मुख्याध्यापक सचिन पाटील, आष्पाक आत्तार यांनी प्रमुख मार्गदर्शकांचा सत्कार केला.

वैभव मुळे यांनी प्रास्ताविक केले तर एकनाथ मुळे यांनी आभार मानले.

कार्यक्रमाला संस्थापक सचिव एकनाथराव जाधव, सहसचिव सत्यजित जाधव, संचालक रणजीत जाधव यांचे सह सर्व विद्यार्थी शिक्षक उपस्थित होते.