कडेठाण येथील रेल्वे पुलाखाली पाणी व ऊस पडून साचत असल्याने अपघाताला आमंत्रण
रेल्वे पुलाखाली पाणी व ऊसाचा कचरा साठल्याने वाहतुकीस अडथळा
पाटस : कडेठाण (ता. दौंड) येथील रेल्वे पुला खाली पाणी व ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रक्टर मधून ऊस पडून साचत असल्याने ये-जा करण्यास अडचण होत आहे, तर रात्रीच्या वेळी अंदाज येत नसल्याने पुलाखालून जाणे अवघड होत असून मोठा अपघात होण्याची दाट शक्यता आहे. शिवाय याच पुलाखालून शाळेत येण्यासाठी मुले-मुली सायकलने, तसेच पायी ये- जा करतात.
पावसाळ्यात नसताना पुलाखाली पाणी साचत असल्याने दुचाकी घसरून वारंवार अपघातही होत असल्याने लवकरात लवकर पुलाखालील पाणी जाण्यासाठी रेल्वे विभागाने योग्य उपाययोजना कराव्यात, अशी मागणी ग्रामस्थ व प्रवाशी करीत आहेत.
पाणी जाण्यासाठी पाइप टाकलेले आहेत; परंतु ते पाइप मधून पाणी जात नाही; पाणी जाण्यासाठी पाइप लाइन दुरुस्ती करण्यात येईल. पुलाखालील दोन्ही बाजूस कमी उंचीचे ब्रकेट बसवणे जेणे करून जास्त उंचीचे वाहने व जास्त ऊस भरून जाणे टाळले जाईल यामुळे मोरी मध्ये कचरा पडणार नाही,.



