कुलदीप यादव यांना महात्मा फुलेआदर्श शिक्षक पुरस्कार

कुलदीप यादव यांना महात्मा फुले राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान


वरवंड:स्वाभिमानी शिक्षक व कर्मचारी महासंघ महाराष्ट्र राज्य यांच्यावतीने राज्यातील आदर्श शिक्षक, आदर्श शाळा व आदर्श मुख्याध्यापक यांना महात्मा फुले राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले महाराष्ट्रातील वेगवेगळ्या जिल्ह्यामधून 56 पुरस्कार वितरण करण्यात आले यामध्ये पुणे जिल्ह्यातील आदर्श माध्यमिक,उच्च माध्यमिक विद्यालय कानगाव ता दौड येथील उच्च माध्यमिक विभागाचे प्रमुख प्राध्यापक कुलदीप यादव यांना आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. गेली तेरा वर्ष कानगाव येथील आदर्श विद्यालय मध्ये प्राध्यापक कुलदीप यादव हे पवित्र ज्ञानदानाचे कार्य करत आहेत. गेल्या 13 वर्षाच्या आपल्या कार्यकाळामध्ये अनेक विद्यार्थ्यांना ज्ञानदान करून विद्यार्थी घडविण्याचे काम त्यांनी केले आहे. शिक्षणाबरोबर इतर वेगवेगळे गुण विद्यार्थ्यांच्या अंगी यावे म्हणून व्याख्यानमाला, काव्य संमेलन, सांस्कृतिक कार्यक्रम, शैक्षणिक सहली, वक्तृत्व स्पर्धा इत्यादी उपक्रमामध्ये ते विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत आहेत.आपल्या सहकारी शिक्षकांच्या मदतीने गरीब गरजू विद्यार्थ्यांना मदत करणे, गरीब मुलींच्या लग्नामध्ये संसार उपयोगी साहित्य देणे, गरीब विध्यार्थी दत्तक घेणे अशा उपक्रमामध्ये सरांचा नेहमीच सहभाग असतो.
त्यांना मिळालेल्या या पुरस्कारामुळे परिसरातील सर्वच मान्यवरांकडून त्यांचे कौतुक केले जात आहे.
वरवंड ग्राम शिक्षण संस्थेचे अध्यक्ष संजय अण्णा दिवेकर, संस्थेचे सर्व विश्वस्त, विद्यालयाचे प्राचार्य डॉ. नानाभाऊ खैरनार, विद्यालयाचे सर्व शिक्षक, कानगाव गावातील सर्व पदाधिकारी ग्रामस्थ व पालक यांनी सरांचे अभिनंदन केले. हा पुरस्कार वितरण सोहळा प्रमोद महाजन सभागृह धाराशिव या ठिकाणी पार पडला. स्वाभिमानी शिक्षक व कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर बापूराव अडसूळ, ज्येष्ठ शिक्षण तज्ञ सुधीर अण्णा पाटील, मराठा कुणबी महासंघाचे अध्यक्ष ॲड. तुकाराम शिंदे, मराठा कुणबी महासंघाचे सर्व पदाधिकारी तसेच महाराष्ट्रातून आलेले सर्व पुरस्कारार्थी आणि त्यांचे सहकारी शिक्षक उपस्थित होते.