पान दुकानातील पानातून नशा होते ?

आवाज लोकशाहीचा
लोणी प्रतिनिधी-सनी फलटणकर

नशेच्या साम्राज्यामध्ये चरस गांजा यांसह गोवा गुटका याचा सर्रास वापर होत असताना पुणे शहराला चिकटून असलेल्या लोणी काळभोर आणि उरुळी कांचन परिसरात खाण्याच्या पाण्यामधून नशा करण्याचा जोरदार कार्यक्रम सुरू झाला आहे.तरुणाई याची शिकार मोठ्या प्रमाणात होत असल्याने पालक वर्गांसह प्रशासनाला मोठे आव्हान निर्माण झाले आहे.

या बाबत सविस्तर माहिती अशी की उद्याचे भावी नागरिक म्हणून ज्यांच्याकडे पाहिले जाते त्या तरुणांना नशेखोर बनवण्यासाठी शासन मुक संमती देते आहे. असे अनेक गोष्टींचा विचार करता शंका उपस्थित होते आहे.त्यात अत्यंत महत्वाचा आणि अलीकडच्या काळात राजरोसपणे मिळणारा गोवा गुटका सर्वांचे लक्ष वेधनारा विषय आहेच मात्र गावठी दारू आणि प्रत्येक धाब्यावर शासकीय आशीर्वादाने मिळणारी दारू प्रशासनाच्या आशीर्वादाचा भागच आहे.

दहा पाच रुपयाच्या महिन्यातील हप्त्यापायी शासनाची यंत्रणा याकडे गांभीर्याने पाहत नाही परिणामी राजरोस पने बंदी असलेल्या मादक पदार्थांची खुले आम विक्री केली जाते .सद्या माणिकचंद  विमल या नावाचे मादक असणारी गुटका विक्री सर्वत्र आहे.हा त्यातील प्रकार नव्हे काय?

मात्र त्याला बंदी आहे असा शासनाचा दूध खुळा कार्यक्रम सुधा लोकपरीचीत आहे.नशा करणे सद्या एक फॅशन झालेली आहे.नशेचा नवीन प्रकार सद्या पान दुकानातून खाण्याच्या पानातून सुरू झाला आहे.

कॉलेज असलेल्या भागात याचा उपद्रव मोठ्या प्रमाणात आहे नशेले पान म्हणून त्याची व्याप्ती वाढली आहे.प्रशासन झोपेचे सोंग घेऊन या व्यवसायाला एक प्रकारे पाठबळ देते आहे.या बाबत बातम्या आल्या की त्यांना नवीन मिळकतीचा मार्ग उघडतो आहे.

परिणामी लोकांच्या भाषेत याला हप्ता हे गोंडस नाव देण्यात आले आहे.नशा दारू गांजा मधून पारंपरिक होत होती ती पूर्वी वयोवृध्द जास्त प्रमाणात करीत होते हळू हळू तिचा प्रसार झाला तिला प्रशासनाला आवर घालता आला नाही परिणामी तिला पाठबळ मिळाले आणि तिचा प्रसार मोठा झाला आणि ती गावच्या बाहेर असणारी घरांच्या उंबरठयावर आली घरात गेली आणि गोरगरीबांना ती अमृत तुल्य झाली  याचा विपरीत परिणाम व्यसनाधीन असणाऱ्या समाजाची मोठी व्यक्ती वाढली आणि यामध्ये तरुणाई भरकटली गेली.

सध्या या तरुणाईला वेगवेगळ्या स्वरूपाच्या मादक पदार्थाच्या व्यसनाची सवय लागावी म्हणून अनेक बहात्तर यासाठी काम करीत आहेत.गोवा गुटख्या पासून त्या नशेच्या अनेक प्रकारच्या मादक पदार्थांच्या विक्रीसाठी आता राजरोसपणाने मार्केटिंग होऊ लागलेला आहे त्यापैकी एक मार्केट आता खाण्याच्या पानांमधून समोर आल्याने ही वाढती चिंता पालक वर्गासाठी जरी असेल तरी शासनासाठी आता नवीन हप्तेगिरी म्हणून निर्माण होते हे काय असा प्रश्न या निमित्ताने पुढे येत आहे