आवाज लोकशाहीचा
यवत प्रतिनिधी….सहजपूरच्या सरपंच प्रियांका माकर. यांनी कोट्यवधी रुपयांच्या विकासकांना गती देऊन अखेर मुदत संपल्याने आपल्या पदाचा राजीनामा दिला,
नव्याने गावच्या सरपंच सविता मेहर यांनी सद्या पदभार स्वीकारला आहे .
माकर यांनी गावच्या सरपंच पदी जवळपास दीड वर्षाचा कार्यकाल सांभाळताना त्यांनी आमदार राहुल कुल यांच्या मदतीने गावात जवळपास दोन कोटी अधिक रुपयांच्या विकास कामे करण्याचा यशस्वी प्रयत्न केला आहे .
पैकी काही कामे प्रगतपथावर असून काही पूर्ण झालेली आहेत .गावच्या जलाजिवन नळ पाणीपुरवठा योजनेला आलेली अडचण आणि त्यातून रखडलेले काम त्यांना सुरू करताना मोठे परिश्रम करावे लागले आहेत .सद्या बंद पडलेली ही योजना सुरू आहे लवकरच गावाला या योजनेतून शुद्ध नलाचे पाणी पिण्यास मिळणार आहे .
तालुक्यात महिला सरपंच पदी अनेक गावात काम.होत असेल तरी सहजपुर गावाचा वेगळा भाग आहे कारखानदारी असलेला या गावच्या परिसरात काही स्थानिक.ठेकेदारांनी आपली राजकीय ताकत निर्माण केल्याने त्यांच्या विचारा शिवाय सरपंच याला कारभार करताना मोठ्या अडचणी असतात मात्र माकर यांनी त्यांची डाळ शिजू दिली नाहीं,परिणामी काहींनी त्यांना अडचणीत आंनायचा मोठा भागीरथी प्रयत्न सुधा केला होता .
ग्रामपंचायत सदस्य असलेल्या सहकर्यांच्यां विचारा नुसार त्यांना ठरून देलेली सरपंच पदाची मुदत संपल्याने त्यांनी राजीनामा दिला आहे .त्यांच्या जागी नव्याने सविता मेहर या महिलांना काम करण्याची संधी मिळाली असून या महिलांना कडून ही गावच्या विकास साठी अश्याच स्वरूपाची कामे होईल अशी अपेक्षा गावकऱ्यांची आहे .



