निरगुडे(इंदापूर)विवाहितेच्या छळ प्रकरणी सहा जणावर गुन्हा दाखल

भिगवण :निरगुडे (ता. इंदापूर) येथील विवाहितेला नविन ट्रॅक्टर घेण्यासाठी वडीलांकडुन दोन लाख रूपये घेवुन ये असे म्हणुन वारंवार शाररीक व माणसीक त्रास देवुन मारहाण केकेल्याप्रकरणी भिगवण पोलीस स्टेशनला पती, सासू,सासरे चुलत दिर अश्या सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबतची फिर्याद, प्रियंका गणेश लकडे (वय 25 वर्षे रा. निरगुडे ता इंदापुर सध्या रा. निंबोडी ता. पारगाव खंडाळा जिल्हा सातारा) दिली असून फिर्यादीमध्ये म्हटले आहे की, नविन ट्रॅक्टर घ्यायचा आहे तुझे वडीलांकडुन दोन लाख रूपये घेवुन ये असे म्हणुन वारंवार शाररीक व माणसीक त्रास देवुन मारहाण केली आहे असून चारीत्र्यावर संशय घेवुन हाताने हाणमार करून, मला घराचे बाहेर हाकलुन देवुन फिर्यादीच्या मुलास ताब्यात न देता सासरकडे ठेवुन घेतले तसेच माझा मानसिक व शाररीक छळ केला केल्याप्रकरणी आरोपी पती गणेश हनुमंत लकडे, सासरे हनुमंत पांडुरंग लकडे, सासु विजया हनुमंत लकडे, चुलत दिर ओंकार नाना लकडे, चुलत सासरे भानुदास पांडुरंग लकडे, चुलत सासुमाधुरी भानुदास लकडे (सर्वे रा. निरगुडे ता इंदापुर) यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास भिगवण पोलीस स्टेशनचे सहाय्यक निरीक्षक विनोद महांगडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार वाबळे करत आहे.