कर्मयोगी साखर कारखान्यायावर कारवाईसाठी साखर आयुक्तालयासमोर उपोषण
कोट्यावधी रुपयांचा गैरव्यवहार केल्याचा सभासद रमेश धवडे यांचा आरोप…
साखर आयुक्त कारवाई करणार का ?
पुणे : इंदापूर येथील कर्मयोगी सहकारी साखर कारखान्याच्या साखर विक्री मध्ये चेअरमन आणि कार्यकारी संचालक यांनी गैरव्यहार केला असून कारखान्यास १५० कोटींचे कर्ज सरकार कडून देण्यात आले होते त्या पैश्याचा कसा उपयोग केला याचा हिशोब देण्यात येत नसल्याने साखर आयुक्तालयासमोर कारखाण्याचे भिगवण येथील सभासद रमेश नामदेवराव धवडे सोमवार (दि,७) रोजी पासून लक्षवेधी बेमुदत उपोषणाला बसले असून कारखाना चेअरमन आणि कार्यकारी संचालक यांच्यावर कारवाईची मागणी केली आहे.
याबाबत, रमेश धवडे यांनी साखर आयुक्त कुणाल खेमणार यांना लिहलेल्या पत्रात म्हटले आहे की, कर्मयोगी कारखान्याचे चेअरमन हर्षवर्धन पाटील व कार्यकारी संचालक देवराम लोकरे यांनी नियमबाह्य पद्धतीने साखर विक्री करून कोट्यावधी रुपयांचा गैरव्यवहार केला असून याबाबत संचालक मंडळाला साखर विक्रीचा हिशोब मागितला असता तो देण्यास टाळाटाळ केली जात असून कारखाना मंडळ सहकार आयुक्त यांच्या कायद्याचे पालन करत नसून तसे लेखापरीक्षण अहवाल मध्ये नमूद केले आहे.
कर्मयोगी साखर कारखान्याला सरकार कडून १५० कोटी कर्ज देण्यात आले होते या कर्जाचा संचालक मंडळाने कसा उपयोग केला आहे याचा हिशोब मागितला असता सभासदांना देण्यात नाही त्यामुळे कारखाना संचालक मंडळ बरखास्त करून प्रशासकाची नेमणूक करण्यात येवून साखर कारखान्यात गैरव्यहार केल्याप्रकरणी साखर आयुक्तांनी कारवाई करण्याची मागणी केली आहे.



