गोपाळवाडीत महिला सन्मान सप्ताह साजरा | शिक्षणा बरोबर स्वसंरक्षण शिकून सावित्री जिजाऊच्या लेकी बना – न्यायाधीश एस.ए.विराणी
आवाज लोकशाहीचा
विशेष प्रतिनिधी:-विठ्ठल होले
दौंड तालुक्यातील गोपाळवाडी ग्रामपंचायत कार्यालय येथे सन २०२१ पासून ३ जानेवारी क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले जयंती ते १२ जानेवारी जिजाऊ जयंती निमित्त महिला सन्मान सप्ताह सोहळा साजरा करण्यात आला आहे..
गावचे माजी तंटामुक्ती अध्यक्ष विठ्ठल होले यांनी या सोहळ्याची चार वर्षापूर्वी सुरवात केली असताना या कार्यक्रमाला दरवर्षी उच्च पदावर विराजमान असलेल्या महिला अधिकारी यांना निमंत्रित करून जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थी यांना मार्गदर्शन केले जाते आहे..
क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले यांच्या जयंती निमित्त आयोजित कार्यक्रमात दौंड न्यायालयातील न्यायाधीश एस.ए.विराणी,राज्य राखीव गट पाच चे सहायक समादेशक सचिन डहाळे आणि ऍड कावेरी गुरसाळ यांना आमंत्रित करण्यात आले होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक विठ्ठल होले यांनी केले तर कार्यक्रमाची रूपरेषा अनुराधा जगताप केले..
यावेळी बोलताना विराणी यांनी या सोहळ्याचे कौतुक केले,असे कार्यक्रम राबविणे कौतुकास्पद आहे.क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले यांच्या मुळेच आपण सर्व महिला उच्च पदावर विराजमान होऊ शकलो,मुलांना पहिले संस्कार आई वडील देतात नंतर शिक्षक,सर्व विद्यार्थिनींनी शिक्षण घेऊन सावित्रीची लेक बनावे,आणि जिजाऊनी छत्रपती शिवाजी महाराजांना स्वसरणक्षणाचे धडे देऊन शुर विर तयार केले,मुलींनी सुध्दा शिक्षणाबरोबर मैदानी खेळ तसेच स्वसरक्षणा साठी कराटे प्रशिक्षण घेतले पाहिजे असे मत विराणी मॅडम यांनी व्यक्त केले आहे..
सहायक समादेशक सचिन डहाळे यांनी विद्यार्थ्यांना छान मार्गदर्शन केले,फुले दाम्पत्यानी १ जानेवारी १८४८ रोजी मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली त्यावेळी त्यांना खूप त्रास सहन करावा लागला त्यांनी त्यांची जिद्द आणि चिकाटी सोडली नाही,मुलींनी आत्मनिर्भर बनने ही काळाची गरज आहे.सोशल मीडिया मुळे अनेक घटना घडत आहे त्यासाठी मुलींनी आत्मनिर्भर बनावे यावेळी डहाळे सर यांनी सर्व विद्यार्थी शिक्षिका सर्व सदस्य यांना पोलिसांचे प्रात्यक्षिक पाहण्यासाठी आमंत्रित केले आहे..
कार्यक्रमात चिमुकल्या मुलीनी सावित्रीमाई फुले यांची वेशभूषा करून आपले मनोगत व्यक्त केले.
या वेळी प्रमुख पाहुणे न्यायाधीश एस ए विराणी मॅडम,डहाळे सर,ऍड कावेरी गुरसाळ, ग्रामपंचायत सरपंच निताताई गिरमे,माजी सरपंच वैशालीताई शिंदे,सीमाताई बोरवके, वर्षा ताई लोणकर,रोहिनिताई शिंदे,स्वातीताई पवार,अंगणवाडी शिक्षिका,जिल्हा परिषद शाळेतील शिक्षिका,मुख्याध्यापक इंगळे सर,होळकर भाऊसाहेब,दत्तात्रय जगताप,संतोष,होले,सतिश होले,संकेत होले,जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे आभार किशोर टेकवडे यांनी मानले.



