राजेश होले यांना  साहित्य रत्न पुरस्कार..महात्मा फुले यांच्या खानवडी मधील कार्येक्रम

खानवडी येथे महात्मा फुले प्रबोधन मराठी साहित्य संमेलनात राजेश होले यांना साहित्य रत्न पुरस्कार प्रदान

आवाज लोकशाहीचा
विशेष प्रतिनिधी:-विठ्ठल होले

क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले व क्रांतीसुर्य महात्मा फुले यांच्या गावी
पुरंदर तालुक्यातील खानवडी येथे झालेल्या महात्मा फुले प्रबोधन मराठी साहित्य संमेलनात दौंड तालुक्यातील गोपाळवाडी गावचे सुपुत्र मोडी लिपी तज्ञ डॉ.राजेश नामदेव होले यांना साहित्य रत्न पुरस्कार सन्मानित करण्यात आले आहे.

श्री.डॉ.राजेश नामदेव होले.”SKY Word’s उद्योग समुहाचे फाऊंडर आहेत,मोडी लिपी तज्ञ तसेच विविध भाषा अभ्यासक म्हणून परिचित आहेत.शिक्षण श्रेत्रात खुप कमी वयामध्ये उंच शिखर सर करणारे व्यक्तिमत्त्व मोडीलिपी उर्दु फार्शी अरेबिक कोंकणी कन्नड सिंधी इ.भाष्यांचे सखोल अभ्यासक/ट्रान्सलेटर म्हणून त्यांचा नावलौकिक आहे.

सामाजिक,संस्कृतीक आणि धार्मिक श्रेत्रात उत्साहाने योगदान देणारे त्याच बरोबर नॅशनल,इंटर नॅशनल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

राजेश होले यांना अभिनेत्री क्रांती मेस्त्री,नितल शितोळे झगा फेम, संगिता लोदगेकर सुर्यवंशी लावणी सम्राज्ञी यांच्या हस्ते साहित्यरत्न पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे.

स्वर्गीय नंदकुमार दिवसे साहित्य नगरीत उद्घाटक जेष्ठ कवी प्रकाश घोडके,संमेलनाचे अध्यक्ष मा न्यायाधीश वसंतराव पाटील होते,कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष खानवडी मा सरपंच रविंद्र फुले,निमंत्रक सुनिल धिवार संस्थापक अध्यक्ष बहुजन हक्क परिषद, छायाताई नानगुडे सचिव महिला जिल्हा पत्रकार संघ तसेच पुरंदर तालुक्यातील मान्यवर उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे आयोजन दशरथ यादव,राजाभाऊ जगताप,गंगाराम जाधव,दत्तानाना भोंगळे यांनी केले होते.