आवाज लोकशाहीचा-: सांगली
विशेष प्रतिनिधी :-आष्पाक आत्तार
शैक्षणिक ज्ञानाबरोबर व्यावहारिक ज्ञान विद्यार्थ्यांना मिळावे या उद्देशाने इस्लामपूर येथील सद्गुरु आश्रमशाळेत खाद्य जत्रेचे आयोजन करण्यात आले होते.पहिली ते बारावीच्या जवळपास २५० विद्यार्थ्यांनी या खाद्य जत्रेत भाग घेत आपले स्टॉल लावले होते.सकाळी आठ ते दुपारी बारा वाजेपर्यंत झालेल्या चार तासातील या खाद्य जत्रेत जवळपास दोन लाखांची उलाढाल झाली आहे..
दिवाळीच्या सुट्टीनंतर शाळेचे दुसरे शैक्षणिक सत्र सुरू झाले की शाळांमधून विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.त्यातीलच एक भाग म्हणून सद्गुरु आश्रम शाळेने या आगळ्या-वेगळ्या उपक्रमाचे आयोजन केले होते.विद्यार्थ्यांनीही या उपक्रमात उत्स्फूर्त प्रतिसाद देत आपला सहभाग नोंदवला होता.
चहा,वडापाव,दही धपाटे,खरडा भाकरी,मसाले दूध,थंडाई,चिकन ६५,बिर्याणी,पिझ्झा,बर्गर,मसाले पान, कोबी मंचुरियन,आंबोळी,डोसा, उत्तप्पा,आप्पे इडली,भजी,स्वीट कॉर्न,यासह अनेक वेगवेगळ्या पदार्थांची मेजवानी खवय्यांना या खाद्य जत्रेत मिळाली.
विद्यार्थ्यांनी गुंतवलेल्या भांडवल पेक्षा अधिक नफा विद्यार्थ्यांना मिळाला.त्यामुळे सर्वच बालचमू खुश होते.परिसरातील नागरीक पालक विद्यार्थी यांनी या खाद्य जत्रेत मोठी गर्दी केली होती. त्यामुळे या खाद्य जत्रेला जत्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते.



