कुरकुंभ एमआयडीसी मध्ये पुन्हा भीषण स्फोट !
अल्कलाईन कंपनीतील स्फोटात एक जण गंभीर जखमी !
आवाज लोकशाहीचा
विशेष प्रतिनिधी:- विठ्ठल होले
दौंड तालुक्यातील कुरकुंभ एमआयडीसी मध्ये शनिवारी दि २८ रोजी सकाळी ६ वाजताच्या दरम्यान मोठा स्फोट झाल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले झाले होते.
एमआयडीसी मध्ये दुर्घटना सतत घडत आहेत त्यामुळे कुरकुंभ पांढरेवाडी तसेच परिसरातील नागरिक भीतीच्या सावटाखाली जगत आहेत..
शनिवारी दि २८ रोजी सकाळी शांत वातावरणात स्फोटाचा आवाज एवढा प्रचंड मोठा होता,की पूर्ण परिसर दणाणून सोडला,धुराचे लोटच्या लागला लोट उठले होते.
या स्फोटाच्या घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक गोपाळराव पवार,सहायक पोलीस निरीक्षक नागनाथ पाटील,सहायक फौजदार श्रीरंग शिंदे घटना स्थळी दाखल झाले होते..
या स्फोटात एक जण गंभीर जखमी झाला असल्याची माहिती सहायक पोलीस निरीक्षक नागनाथ पाटील यांनी सांगितले आहे.
कुरकुंभ येथील अल्कलाईन अमाइन्स या कंपनीत सदरचा स्फोट झाला आहे.औद्योगिक सुरक्षा विभागाचे अधिकारी घटना स्थळी दाखल झाले होते.झालेल्या घटनेची चौकशी होऊन माहिती घेतली जाईल सांगण्यात आले आहे,
सदर घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक गोपाळराव पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक नागनाथ पाटील करीत आहेत.



