गोपाळवाडीत तरुणांच्या सहकार्याने रस्त्याच्या कडेची अतिक्रमणे हटविली, डिजे आणि फ्लेक्स बंदीचा ठराव एकमताने मंजूर
आवाज लोकशाहीचा
विशेष प्रतिनिधी:-विठ्ठल होले
दौंड तालुक्यातील गोपाळवाडी गावची ग्रामसभा खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली,सभेत विविध विषयावर चर्चा झाली,त्यामध्ये प्रामुख्याने डीजे व फ्लेक्स बंदीचा ठराव टाळ्या वाजवून एकमताने मंजूर करण्यात आला, विठ्ठल होले यांनी तो ठराव सभेत मांडला त्याला उपसरपंच प्रविण होले यांनी ग्रामस्थांच्या वतीने अनुमोदन दिले आहे.
यावेळी दौंड पोलीस स्टेशनचे बीट अमलदार महेश भोसले व असिफ सय्यद हे उपस्थित होते..
महेश भोसले यांनी सांगितले की इथून पुढे कोणाचाही डि जे गावात वाजणार नाही तसे झाल्यास ११२ या नंबरवर कोणीही फोन करून माहिती द्यायची लगेच कारवाई करण्यात येईल.
त्यानंतर महात्मा गांधी तंटामुक्त गाव समितीचे अध्यक्ष यांची निवड करण्यात आली, माजी अध्यक्ष भीमराव चोरमले आणि उपाध्यक्ष राजेंद्र सोनवलकर यांचा कार्यकाल संपल्यामुळे सागर गिरमे यांची अध्यक्ष आणि अनिल डोंगरे यांची उपाध्यक्ष म्हणून बिनविरोध निवड जेष्ठ नेते बबनराव लव्हे यांनी केली..
इतर सर्व विषय वाचून झाल्यानंतर दौंड गोपाळवाडी गिरीम या गावठाणातील मुख्य रस्ता काँक्रीटीकरण होणार आहे,त्या रस्त्याच्या दोन्ही बाजूला थोडेफार अतिक्रमण झाले आहे ते तेथील रहिवाशांना समजावून सांगून काढण्याचे ठरवण्यात आले आणि सरपंच,उपसरपंच सर्व सदस्य आजी माजी अध्यक्ष,ग्रामसेवक झुंबरराव होळकर सर्व ग्रामस्थ यांनी मिळून रस्त्याच्या कडेची अतिक्रमणे हटविली आणि रस्ता मोकळा केला,यामध्ये ग्रामस्थांनी एकोप्याने मोठ्या संख्येने सहभाग घेतला,तरुणांनी तब्बल बारा तास अथक परिश्रम घेऊन रस्ता मोकळा केला.आजी माजी अध्यक्ष,उपाध्यक्ष यांचा फेटा,शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.



