आमच्यावर होणारेअन्याय अत्याचार सहन करणार नाही …आंबेडकर अनुयायी सुनील.धिवार

आमच्या वर होणारे अन्याय अत्याचार यापुढे सहन केले जाणार नाही -सुनिल धिवार.

आवाज लोकशाहीचा
विशेष प्रतिनिधी :- एम जी शेलार

देशात आणि राज्यातही सातत्याने जाणीव पुर्वक दलितांवर अत्याचार, आंबेडकर पुतळे,संविधान अवमान घटना घडत असून शासन व्यवस्था या बाबत कठोर निर्णय घेत नाही.आम्ही संविधाना नुसार कायद्यातून शांतता पाळत आलो आहोत.परंतू यापुढे अन्याय सहन केला जाणार नाही. असा खणखणीत जाहीर इशारा बहुजन हक्क परिषदेचे संस्थापक अध्यक्ष व पुरंदर तालुक्यातील जेष्ठ कार्यकर्ते सुनिल धिवार यांनी सासवड येथे आंदोलन प्रसंगी बोलताना दिला आहे.

यावेळी संघटनेचे शशीभाऊ गायकवाड,रामोशी समाजाचे नेते बदाम माकर,पत्रकार शिवराज झगडे,वडार समाजाचे युवा नेते विजय धोत्रे,भारतीय बौद्ध महासभेचे अनिल मसने,काँग्रेसची महिला अध्यक्ष पूनम सावंत,सुनिल जगताप,संदीप भोंडे,आण्णा बोडरे, संदीप भोंडे, ओंकार बहुले,राजू भोंडे, राज खवले, सचिन आढागळे, अनिरुद्ध दोडके, दत्ता कोकरे, आबा वाघमारे,श्रीधर गायकवाड,पुरुषोत्तम पवार,अजय शिंदे,गुलाबराव सोनवणे,सचिन शिंदे, आनंदराव घोरपडे,संजय सोनवणे, सचिन खरात,सिद्धार्थ यादव,धीरज यादव,तुषार लोंढे,सचिन लोंढे,
संदेश सोनवणे,अभिजीत सोनवणे,उपस्थित होते.

महापुरुष ही देशाची संपत्ती आहे असताना परभणी येथील संविधानाच्या वास्तविकेच्या तोडफोड प्रकरणी भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकेचे तोडफोड करणाऱ्या विकृत मनोवृत्ती च्या माणसावर व त्यामागच्या मास्टर माईंड वर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा.अशी मागणी करण्यात आली आहे.

दुसरी मागणी संपूर्ण भारत देश ज्या महामानवाच्या संविधानावर चालतो असे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबत या देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी आक्षेपार्ह वक्तव्य करून थट्टा उडवली.त्या संदर्भामध्ये जाणीव पूर्वक बहुजन समाजामध्ये द्वेष निर्माण होऊन जातीय दंगली घडून याव्यात या उद्देशाने गृहमंत्री अमित शहा यांनी वक्तव्य केलेले आहे.

तरी या मंत्री महोदयांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून गृहमंत्री पदाचा राजीनामा द्यावा.अशी मागणी संघटनेने केली आहे.अमित शहा यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या संदर्भात केलेल्या वक्तव्याचा जाहीर निषेध करण्यात आला आहे.

तर तिसरी मागणी परभणी येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधान स्टॅच्यू संदर्भामध्ये झालेल्या विटंबना संदर्भात संपूर्ण महाराष्ट्र सह देशभर आंदोलन होत आहे.त्यामध्ये पोलिसांनी परभणी येथे केलेल्या कोंबिंग ऑपरेशन मध्ये सोमनाथ सूर्यवंशी हा तरुण युवक पोलीस कस्टडीमध्ये मृत पावला आहे.

विधी विद्यार्थी सोमनाथ सूर्यवंशींना झालेल्या जबर मारहाणीमुळे व त्यांना वेळीच योग्य उपचार न मिळाल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला आहे त्याला जर वेळेत दवाखान्यामध्ये योग्य उपचार मिळाले असते तर त्यांचा मृत्यू झाला नसता.तरी त्यांच्या मृत्यूस कारणीभूत असणाऱ्या संबंधित पोलीस अधिकारी व कर्मचारी यांच्यावर निलंबनाची कारवाई करून सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी करण्यात आली आहे.

बीड येथील आदर्श सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या करण्यात आली आहे.त्या आरोपींना शोधून त्यांना फाशीची शिक्षण देण्यात यावी.
संघटनेच्या वतीने मागणी करण्यात आली आहे.अशा आशयाचे निवेदन प्रांतधिकारी,तहसीलदार व सासवड पोलीस स्टेशनचे पोलिस निरीक्षक पोटे यांना देण्यात आले आहे..

यावेळी बहुजन हक्क परिषदेचे संस्थापक अध्यक्ष सुनील धिवार,जेष्ठ भीमसैनिक विष्णूदादा भोसले, संघटनेचे सचिव कैलास धिवार,माजी नगरसेवक सोपान रणपिसे,राष्ट्रवादीचे नेते बंडूकाका,शिवसेनेचे नेते अभिजित जगताप,मासूम चे श्रीकांत लक्ष्मी शंकर,जेष्ठ पत्रकार एम.जी.शेलार आदींनी निषेध व्यक्त केला आहे.

यावेळी संघटनेचे शशीभाऊ गायकवाड,रामोशी समाजाचे नेते बदाम माकर,पत्रकार शिवराज झगडे,वडार समाजाचे युवा नेते विजय धोत्रे,भारतीय बौद्ध महासभेचे अनिल मसने,काँग्रेसची महिला अध्यक्ष पूनम सावंत,सुनिल जगताप,संदीप भोंडे,आण्णा बोडरे, संदीप भोंडे, ओंकार बहुले,राजू भोंडे, राज खवले, सचिन आढागळे, अनिरुद्ध दोडके, दत्ता कोकरे, आबा वाघमारे,श्रीधर गायकवाड,पुरुषोत्तम पवार,अजय शिंदे,गुलाबराव सोनवणे,सचिन शिंदे, आनंदराव घोरपडे,संजय सोनवणे, सचिन खरात,सिद्धार्थ यादव,धीरज यादव,तुषार लोंढे,सचिन लोंढे,
संदेश सोनवणे,अभिजीत सोनवणे,उपस्थित होते.