कुसेगावच्या यात्रेचा पाहुणचार घेऊन भानोबा देवांचे  कोयाळी मूळ गावाकडे वाटचाल……

भानोबाचा पालखी सोहळा परतीच्या दिशेने.
( वरवंडला स्वागत,विश्रांती.)

वरवंड प्रतिनिधी विजय मोरे:-   कुसेगाव येथील भानोबा देवाची यात्रा उत्सव संपवून,भानोबा देवाचा पालखी रथ  आपल्या मूळ कोयाळी.गावाकडे निघाला आहे

गुरुवार दिनांक २० रोजी भानोबा देवाच्या मुखवट्याची विधीवत पूजा आरती करून पालखी सोबत असलेल्या नागरिकांनी कुसेगाव ग्रामस्थांना निरोप देऊन,पालखी सोहळा.आपल्या मूळ. कोयाळी गावाकडे परतीच्या दिशेने मार्गस्थ झाला.
दरम्यान शुक्रवार दिनांक२१ भानोबा देव पालखी सोहळा वरवंड येथे दुपारच्या विश्रांती साठी दाखल झाला.यावेळी समाजबांधवांच्या वतीने पालखी सोहळ्याचे स्वागत करण्यात आले.यावेळी वरवंड येथील जय मल्हार क्रांती संघटनेचे अध्यक्ष बापू खोमणे यांच्या हस्ते भानोबा देवाची आरती करण्यात आले.यावेळी पालखी सोबत आलेल्या भाविकांना भोजन न्याहरीचे आयोजन करण्यात आले होते.ग्रामस्थ व समाज बांधव उपस्थित होते.