दौंड शहराचा अनेक वर्षाचा शौचालयाचा प्रश्न लागणार मार्गी…. ?

दौंड शहरात नवीन वर्षात पुरुषा सह महिलांना मिळणार शौचालय ?,दौंडचे सिंघम मुख्याधिकारी विजय कावळे यांनी जाणून घेतल्या दौंड शहरातील जनतेच्या समस्या !

आवाज : लोकशाहीचा
विशेष:प्रतिनिधी :- विठ्ठल होले

दौंड शहरातील शौचालयाचा प्रश्न खूप गंभीर बनला असताना तालुक्यातून येणाऱ्या लोकांसाठी दौंड शहरात कुठेही शौचालय नसल्याने व्यापार पेठेवर मोठा परिणाम झालेला होता नव्याने मुख्याधिकारी विजय कावळे यांनी याच अडचणी समजून घेत आज पासून कामाला सुरवात केली आहे.

मुख्याधिकारी विजय कावळे यांनी नगरपालिकेतील कर्मचाऱ्यांना ओळखपत्र देऊन सर्वांनी ते रोज कामावर आल्यानंतर गळ्यात घालायचे आहे.तुम्ही कोण ?आहात,तुमचे पद काय?आहे.हे जनतेला कळायला पाहिजे या दृष्टिकोनातून पाहिले पाऊल उचलले आहे.दौंड शहरातील भाजी मंडई परिसरातील महिलांच्या व्यापाऱ्यांच्या समस्या सर्व कर्मचारी स्टाफ घेऊन जाणून घेतल्या आहे.

यावेळी माहिती देताना विजय कावळे यांनी सांगितले की २०२५ या नवीन वर्षात १ जानेवारी रोजी तीन शौचालयाचे उद्घाटन करण्यात येणार आहे.त्यामध्ये भाजी मंडई येथे पुरुषांसाठी पाच आणि महिलांसाठी पाच असे दहा शौचालय सुरू करण्यात येणार आहे हे शौचालय वापरण्यासाठी शुल्क आकारण्यात येणार आहे.या परिसरात सीसीटिव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत.

मंडई परिसरात होणाऱ्या चोऱ्या,दारू पिऊन घाण करणावर नजर ठेवण्यासाठी येथे दोन वाचमन कर्मचारी नेमण्यात आले आहेत.

तर दुसरे शौचालय गांधी चौक येथे जुन्या कोर्टाच्या इमारती मधील शौचालय दुरुस्ती करून ते फक्त महिलांसाठी वापरण्यात येणार आहे.नगरपालिका येथील शौचालय वाटर प्रुफिंग करून तेथील दुर्गंधी हटविण्यात आली असून १ जानेवारी रोजी महिला व पुरुष असे वेगवेगळे शौचालय सुरू होणार आहेत.

त्यामुळे दौंडकरांच्या खूप दिवसापासून अडगळीत पडलेल्या मुतारीचा प्रश्न सुटणार आहे.

यावेळी मुख्याधिकारी विजय कावळे यांनी सांगितले मी व माझे कर्मचारी जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करणार आहे.दौंडच्या जनतेकडून सहकार्य अपेक्षित असल्याचे त्यांनी यावेळी मत व्यक्त केले आहे.