बीड मद्ये नक्की चाललय तरी काय?कायदा  सूव्यवस्था आहे की नाही … एस एम देशमुख

बीड मध्ये चाललंय काय ? कायदा आणि सुस्थिती अस्तित्वात आहे की नाही-एस.एम देशमुख.

आवाज:लोकशाहीचा
विशेष:प्रतिनिधी – एम जी शेलार

बीड मध्ये सरपंचा अमानुष पत्रकारांना अधिकारयांकडुन धमक्या,बीड मध्ये चाललंय काय? कायदा आणखी सूसथिती अस्तित्वात आहे काय? असा स़ंतापजनक सवाल अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदचे प्रमुख विश्वस्त एस.एम.देशमुख यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना व्यक्त केला आहे.

या सर्व प्रकरणाची त्वरीत चौकशी करून अपराध्यांना कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी देशमूख यांनी जाहीरपणे केली आहे.

मस्सा जोगमधील मधील सरपंच हत्या राज्यासह देश सुन्न झाला आहे या घटनेची गंभीर दखल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेऊन दोषींवर कठोर कारवाई करण्याचे आदेश गृह खात्याला दिलेले असताना बीडमधून येणाऱ्या नकारात्मक बातम्या थांबता थांबत नाहीत.बीड येथील दैनिक वास्तवचे संपादक सिरसाट यांना गौण खनिज विभागातील आघाव नावाच्या महिला कर्मचाऱ्याने धमकी दिल्याचे प्रकरण पुढे आले आहे.त्यामुळं बीड मध्ये चाललंय काय? बीडमध्ये कायदा आणि सुव्यवस्था स्थिती अस्तित्वात आहे की नाही?असा सवाल उपस्थित करीत अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस. एम. देशमुख यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे संबंधित महिला कर्मचाऱ्यावर विनाविलंब निलंबनाची कारवाई करावी अशी मागणी केली आहे..

बीड जिल्हयातील सामांन्य माणूस दहशतीखाली आहे.आता माध्यमांवर देखील दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न होत आहे.हे संतापजनक आणि निषेधार्थ आहे.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेची दखल घेऊन आघाव यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस. एम. देशमुख यांनी केली आहे.

बीड येथील दैनिक ‘वास्तव’चे संपादक तथा डिजिटल मिडिया परिषदेचे पदाधिकारी जितेंद्र शिरसाठ यांना जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचारी श्रीमती आगाव यांनी दूरध्वनी वरून फोन करून अर्वाच्च भाषेत धमक्या दिल्या,तू तातडीने येऊन मला भेट अन्यथा तुला उचलून आणण्याची मला व्यवस्था करावी लागेल अशी अरेरावीची भाषा वापरली.

जितेंद्र सिरसाट यांनी जिल्ह्यातील अवैध खनिज उत्खनन विभागा संबंधी बातमी छापली होती.श्रीमती आघाव यांच्या अरेरावी मुळे जिल्ह्यातील माध्यम जगतात संताप व्यक्त होत आहे.आघाव यांच्यावर कठोर कारवाई व्हावी अशी मागणी डिजिटल मिडिया परिषदेचे राज्य अध्यक्ष अनिल वाघमारे यांनी केली आहे.

विशेष वाचा —
समाजातील अन्याय अत्याचार विरुद्ध बातम्या प्रसिध्द करताना प्रसार माध्यमांना वर दडपण आणि धमक्या देवुन दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केल्यास पत्रकार राज्यभर आवाज उडवतील – एस.एम.देशमूख

बीड येथील महिला अधिकारी श्रीमती आढाव यांनी एका संपादकाला धमकी दिलयाने बीड प्रसार माध्यमांत प्रचंड संतापाची लाट उसळली आहे.बीड मधील बिघडलेली कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी मुख्यमंत्री यांनी कठोर पावले ऊचलावित- असे अनिल वाघमारे,राज्य डिजीटल मिडीया अध्यक्ष,बीड यांनी माहिती दिली आहे..