आश्वासनांचे पंधरा दिवस उलटले आणि त्यांनी शब्द पलटले..विधवांच्या अश्रूंची त्यांना किंमत कळणार का?……

चक्री उपोषणाच्या १५व्या दिवशी महिला उपस्थित रमेश थोरात बोलताना

आवाज लोकशाहीचा
वरवंड:प्रतिनिधी

पंधरा दिवस उलटले आणि दिलेला शब्द सुधा चेअरमन राहुल कुल हे पलटले,तिथे अश्रूंना काय किंमत  ते देणार आहे.अशा स्वरूपाची अवस्था भीमा सहकारी साखर कारखान्याच्या मुख्य प्रवेशद्वार बसलेल्या चक्री उपोषण कर्त्यांच्या परिस्थिती कडे पाहून निर्माण झाली आहे..

कारखान्याच्या प्रवेशद्वारासमोर सेवानिवृत्त कामगारांनी आपली राहिलेली देणी मिळावीत म्हणून चक्री उपोषण सुरू केले आहे.आज १५ दिवस झाले,मागील पंधरा दिवसांपूर्वी भीमा सहकारी साखर कारखान्याच्या वार्षिक सर्वसाधारण सभे मध्ये तालुक्याचे आमदार आणि कारखान्याचे चेअरमन यांनी कामगारांची देणे पंधरा दिवसात दिली जातील अशा स्वरूपाची जाहीर माहिती सभेसाठी आलेल्या उपस्थिती त्यांना दिली होती.

याला दुरोजा म्हणून विद्यमान कामगार युनियनचे केशवराव दिवेकर यांनी माईक हातात घेऊन चेअरमन यांनी आमच्याशी मीटिंग घेऊन हा शब्द दिला आहे.अशा स्वरूपाचा खुलासा सुद्धा केला होता या दोन्ही विषयाच्या बातम्या वृत्तपत्रातून ठळक मथळ्याखाली प्रकाशित झालेले आहेत.

पंधरा दिवसाचा काल अखेरचा दिवस संपला चेअरमन यांनी घटनास्थळी या उपोषणा कर्त्यांना भेटून सांगितलं मी फक्त प्रायव्हेट फंडाचे पैसे भरतो असे म्हणालो होतो.तुमची देणी काय आहेत हे मला माहित नाही हे त्यांचे बोल घटनास्थळी असलेल्या कामगारांनी आणि ज्येष्ठ कामगार नेते संपतराव वाबळे व शिवाजीराव काळे यांनी सांगितले आहेत..

शब्दाची पलटी मारणे राजरोस खोटं बोलणे यामध्ये माहीर असलेल्या कुलांनी आम्हाला परत एकदा फसवल आहे.आणि हे त्यांचे वर्तन हे नवीन नाही गेले आठ-दहा वर्ष याचा आम्हाला अनुभव आहेच असे या वेळी स्पष्ट केले गेले आहे.

युनियन मध्ये जे जे पदाधिकारी झाले या सर्वांनी त्याच्याशी चर्चा केलेली आहे.काहींना त्यांनी लेखी आश्वासित केलेला आहे.आणि आज चक्क शब्दच फिरवलेला आहे.ही बाब नवीन नसली तरी उपोषण स्थळी आमच्यापैकी जे बांधव मृत पावले आहेत.त्यातील काही भगिनी ज्यांना अभागण म्हटलं जातं विधवा, त्या येऊन ज्यावेळेस अश्रू गाळतात आपल्या घरातील करता गेल्यानंतर आयुष्यात आलेल्या अडचणींचा अश्रू नयेनाच्या साक्षीनं पाढा वाचतात याचे सुद्धा भान त्यांना नाही असा निर्दयी कुल याला आगामी काळातील त्याच्या जीवन प्रवासात या सर्वांचा तळतळाट लागल्याशिवाय राहणार नाही अशा स्वरूपाची आक्रोश चर्चा आज घटनास्थळी झाली आहे…

शब्द पलटी करणारे सतत खोटे बोलणारे यांना आमच्या महिलांच्या अश्रूंची सुद्धा किंमत राहिलेली नाही अशा स्वरूपाचा क्रोध व्यक्त करीत या ठिकाणी शिवाजी काळे असतील संपतराव वाबळे यांच्यासह आलेल्या विधवा महिलांनी आपल्या जीवनातल्या अडीअडचणींची जाहीर माहिती सर्वांसमोर कथित करून आम्हाला आमची देणे द्यावी त आमच्या घामाचे दाम दिले जावे आमच्यातले सहकारी हयातात नाहीत.आमच्या घरातील करता गेल्यावर आज आमच्या अवस्था काय आहे.गोळ्यांसाठी सुद्धा पैसे नाहीत आजार पाठीमागे लागलेला आहे.अशा स्वरूपाच्या भावना जेव्हा व्यक्त झाल्या त्यावेळी सर्वच उपस्थितांना अश्रू अनावर झाले..

चक्री उपोषण या घटनेने भावनिक झालेला असून खोटारडा पणा अंगात असलेल्या या व्यक्तीकडून आमची देणे मिळतील की नाही हा प्रश्न गहण झाला असला तरी ज्या व्यक्तीने भाडे तत्वावर चालविण्यास घेतलेला आहे.त्याला सुद्धा भविष्य काळातील कारखानदारी आम्ही चालू देणार नाही.आमची देणे त्यांनी द्यावीत अन्यथा आम्हालाही जीव गमवा लागला तरी आम्ही आता मागे हटणार नाही अशा स्वरूपाची भीष्म प्रतिज्ञा सुद्धा या ठिकाणी केली गेली आहे..

सहकारी तत्त्वावर सुरू झालेल्या या गोड साखर कारखान्याची कहाणी यानिमित्ताने कडू झाली असून या कडवट साखरेच्या चवीचा परिणाम विधवा महिलांच्या रडक्या स्वरात तालुक्यातील प्रत्येकाच्या दारात आणि घरात गेल्याशिवाय राहणार नाही अशा स्वरूपाची अवस्था या आंदोलनाचा आढावा घेतल्यास दिसून येतो आहे..