. सत्ताधारी आणि शांत बसलेल्या नेत्यांना आरसा दाखवणारी ही ‘आवाज लोकशाहीचा’ ची विशेष बातमी:
विजय चव्हाण
: संतांच्या महाराष्ट्राचा ‘उत्तरप्रदेश’ होतोय का? भोंदूगिरीचा नंगानाच आणि नेत्यांची लाजीरवाणी शांतता ?
[महाराष्ट्र] – “महाराजांच्या महाराष्ट्रात परस्त्रीला ‘माता’ मानले जाते, पण आज त्याच मातीत ५० हून अधिक महिलांचे आयुष्य एका ‘लफंगा’ भोंदू बाबाने उद्ध्वस्त केले आहे! आणि संतापजनक म्हणजे, या नराधमाच्या पायाशी राज्याचे ‘कर्तेधर्ते’ मंत्री आणि आमदार लोळण घेत होते. हा महाराष्ट्र छत्रपतींच्या स्वाभिमानाचा उरलाय की भोंदूंच्या चरणी गहाण पडलाय?” असा संतप्त सवाल आज प्रत्येक माय-बहीण विचारत आहे.
लव्ह-जिहादच्या नावाखाली तांडव करणारे, हिंदू संस्कृतीच्या बाता मारणारे आणि रात्रीचा दिवस करून गो-रक्षा करणारे आमचे ‘तरुण वाघ’ आता कुठल्या बिळात लपले आहेत?
कुठे गेले ते ‘राणे-चिरंजीव’ आणि ‘पडळकर’?: इतर वेळी टीव्ही कॅमेऱ्यासमोर डरकाळ्या फोडणारे हे नेते आज आपल्याच हिंदू भगिनींच्या विटंबनेवर गप्प का?
सत्तेसाठी ‘भोंदू’ प्रिय?: मंत्रीपद मिळावे आणि आमदारकी टिकवावी म्हणून या भोंदू बाबाच्या दरबारात लोटांगण घालणाऱ्या नेत्यांनी महाराष्ट्राची मान शरमेने खाली घातली आहे.
तुकोबांचे अभंग विसरलात, पण बाबासाहेबांचा कायदा विसरू नका!
जगद्गुरु तुकोबारायांनी “भोंदूचे दांभिकपण” उघड पाडण्यासाठी आयुष्य वेचले. पण आज वारकरी संप्रदायाच्या या पावन भूमीत अंधश्रद्धेचा कर्करोग पसरला आहे.
मुले होतात म्हणून पाया पडणे, साडेसाती घालवण्यासाठी महिलांना मठात बोलावणे… हा कोणता धर्म?
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान दिले, अधिकार दिले, पण त्याच कायद्याची अंमलबजावणी करायला हे राज्यकर्ते का घाबरत आहेत? कायद्याचा धाक राहिला नाही की बाबांच्या आशीर्वादाने हे ‘धाक’ दाबले जात आहेत?
बंडातात्या कराडकरांसारख्या ज्येष्ठ मार्गदर्शकांनी आता गप्प बसून चालणार नाही. हा खेळ मठांचा नसून महाराष्ट्राच्या अस्मितेचा आहे. जी तरुणाई हिंदू राष्ट्राच्या घोषणा देते, त्यांनी विचार करावा – जर हिंदूंची मुलगी मठात असुरक्षित असेल, तर तुमचं हिंदुत्व काय कामाचं?
आवाज लोकशाहीचा ‘आसूड’
हा महाराष्ट्र वीरांचा आहे, शंडांचा नाही! जर आजही हा भोंदू आणि त्याला पाठिंबा देणारे नेते मोकाट राहिले, तर उद्याचा इतिहास तुम्हाला कधीच माफ करणार नाही. कपाळाला माती लावून ‘महाराष्ट्र माझा’ म्हणणाऱ्यांनो, हीच वेळ आहे या मातीची घाण साफ करण्याची!
ठोकून काढा त्या भोंदूंना आणि जाब विचारा त्या मंत्र्यांना! कारण आता प्रश्न ‘भक्ती’चा नाही, तर माझ्या महाराष्ट्राच्या ‘शक्ती’चा आणि ‘स्त्री’च्या ‘अब्रू’चा आहे!
– रोखठोक, सडेतोड…हा लोकांचा आवाज… लोकशाहीचा



