आवाज लोकशाहीचा
दौंड : प्रतिनिधी ..सोलापूर–पुणे राष्ट्रीय महामार्गावरील मुकादमवाडी ब्रिजवर शुक्रवारी (दि. 20 फेब्रुवारी 2026) रात्री सुमारे 8.15 वाजण्याच्या सुमारास घडलेल्या थरारक घटनेत पाटस येथील एका तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आली. या प्रकरणी दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी महेश मारुती टुले (वय २५, रा. तामखडा, पाटस) हे आपल्या मित्रांसह मोटारसायकलवरून पाटसकडे परत जात असताना मुकादमवाडी ब्रिजवर आले. त्यावेळी आरोपींनी पाठीमागून पिकअप गाडीने मोटारसायकलला धडक देऊन सर्वांना खाली पाडले. त्यानंतर मुख्य सूत्रधार म्हणून संतोष शितकल याचे नाव समोर येत असून त्याच्या सांगण्यावरून आनंद माकर, विकी शितकल व त्यांच्या अन्य दोन साथीदारांनी हल्ला केल्याचे फिर्यादीत नमूद आहे.
या हल्ल्यात महेश उर्फ मन्या संजय भागवत (वय २९ रा. पाटस) याच्यावर कोयता व सत्तुरने सपासप वार करण्यात आले. गंभीर जखमी अवस्थेत त्याचा मृत्यू झाला.
मयत महेश उर्फ मन्या संजय भागवत यांच्यावरही खुनाचा गुन्हा असूद्या तो जामीनावर बाहेर होता अशी माहिती मिळालेली आहे
या घटनेप्रकरणी दौंड पोलीस ठाण्यात गु.र.नं. १०७/२०२६ अन्वये भा.न्याय संहिता कलम १०३(१), १०९(१), ६१, ३(५) तसेच शस्त्र अधिनियम कलम ४(२५) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आरोपींमध्ये
आनंद माकर
विकी शितकल
संतोष शितकल (रा. आंबिकानगर, पाटस, ता. दौंड, जि. पुणे)
व इतर दोन अज्ञात इसमांचा समावेश आहे.
गुन्हा दाखल अंमलदार पो.स.ई. सुनील उगले असून तपास पोलीस निरीक्षक गोपाळ पवार करीत आहेत.
या घटनेमुळे पाटस परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून, महामार्गावरील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. वैयक्तिक वैमनस्य की पूर्वनियोजित कट, याचा तपास पोलीस करत आहेत.



