दौंड मध्ये ‘कुल’ गडाला खिंडार; सभेतील त्या टिंगल-टवाळीला रमेश थोरातांचे  सडेतोड उत्तर!?

विशेष विश्लेषण: ‘आवाज लोकशाहीचा’

दौंड (प्रतिनिधी):
दौंड तालुक्याच्या राजकारणात सध्या एकाच चर्चेला उधाण आले आहे, ती म्हणजे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निकालाची. या निकालाने माजी आमदार रमेश थोरात यांच्या नेतृत्वाखालील गटाला मोठे बळ दिले असून, विद्यमान आमदार राहुल कुल यांच्या गटाला मतदारांनी जोरदार धक्का दिला आहे. केवळ पराभवच नाही, तर थोरातांनी कुल यांच्या बालेकिल्ल्यात आपला झेंडा फडकवून त्यांना आत्मपरीक्षणास भाग पाडले आहे.
काही काळापूर्वी साखर कारखान्याच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत आमदार राहुल कुल यांनी रमेश थोरात यांची ‘राजकीय किंमत’ काढत त्यांची मिस्किल टिंगल केली होती. त्यावेळी कुल समर्थकांनी दात काढत आणि टाळ्या पिटत थोरातांची थट्टा केली होती. मात्र, “माझी काय ताकद आहे, हे तुम्हाला आणि जिल्ह्याला ठाऊक आहे,” असे खंबीर उत्तर थोरातांनी त्याच वेळी दिले होते. आज जिल्हा परिषदेच्या निकालाने थोरातांनी आपल्या शब्दाची प्रचिती दिली असून, थट्टा करणाऱ्यांच्या ‘दातात दात’ अडकवण्याचे काम मतदारांच्या जोरावर करून दाखवले आहे.

तालुक्यातील ७ जिल्हा परिषद जागांपैकी तब्बल ६ जागांवर कुल गटाला राजकीय आसमान दाखवण्यात थोरात यशस्वी झाले आहेत. विशेष म्हणजे, कुल यांच्या हक्काच्या बालेकिल्ल्यात थोरातांनी आपला उमेदवार निवडून आणून एक जबरदस्त ‘फटाका’ लावला आहे. एका जागेवर प्रशासकीय दबाव आणि अधिकार्‍यांच्या प्रभावामुळे आपला उमेदवार पराभूत झाल्याचा थेट आरोपही थोरात यांनी केला आहे.अन्यथा सात झिरो असा निकाल झाला असता ,

आजच्या राजकीय समीकरणात राहुल कुल यांच्याकडे तरुण वय, सत्तेची खुर्ची आणि भक्कम आर्थिक परिस्थिती आहे. याउलट, वयाने ज्येष्ठ आणि आर्थिकदृष्ट्या मर्यादित असलेल्या रमेश थोरातांनी केवळ जनसेवेच्या जोरावर कुल यांना जेरीस आणले आहे. “सत्ता आणि संपत्तीने मोठेपण मिळवता येते, पण प्रेम करणारे मतदार विकत घेता येत नाहीत,” हाच धडा या निकालाने दिला आहे.

स्वर्गीय आमदार सुभाष कुल यांच्या राजकीय प्रवासात रमेश थोरात यांनी दिलेले योगदान सर्वश्रुत आहे. विद्यमान आमदारांना वयाची अडचण असताना साखर कारखान्यात पदे देऊन थोरातांनीच बळ दिले होते. मात्र, त्यानंतर कुल परिवाराकडून थोरातांना मिळालेली वागणूक तालुक्याने पाहिली आहे. सुडाचे राजकारण, पोलीस भीती आणि दहशतीचा वापर करूनही थोरातांची ताकद कमी झालेली नाही, उलट ती वाढतच आहे.
गेल्या २० वर्षांपासून सत्तेत असूनही कुल यांना थोरातांचे राजकीय सामर्थ्य का हलवता आले नाही? बालेकिल्ल्यातही लोक थोरातांवरच विश्वास का ठेवतात? या प्रश्नांचे उत्तर शोधण्यासाठी आता कुल गटाला आत्मचिंतनाची वेळ आली आहे, हेच या निकालावरून स्पष्ट होत आहे.

साखर कारखान्याच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत कुल यांनी थोरांची केलेली मिश्किल टिंगल