आवाज लोकशाहीचा: विशेष वृत्तांत
कानगाव–लिंगाळी गटात ‘भाऊसाहेब’ची हवा; साहेबराव पोळ यांच्या प्रचाराचा झंझावात!
पुणे/दौंड:
कानगाव–लिंगाळी जिल्हा परिषद गटात निवडणुकीचा प्रचार चांगलाच तापला असून गेले असून, . ‘भाऊसाहेब… भाऊसाहेब…’ ही साद मतदारांच्या मनावर अधिराज्य गाजवताना दिसत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार साहेबराव पोळ यांनी आपल्या प्रभावी प्रचारयंत्रणेच्या जोरावर सध्या या गटात मोठी आघाडी घेतल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
पाण्याचा ‘माणूस’ आता जनतेचा ‘लोकप्रतिनिधी’
साहेबराव पोळ यांची ओळख केवळ एक उमेदवार म्हणून नाही, तर शेतकऱ्यांचे प्रश्न समजून घेणारा ‘हक्काचा माणूस’ म्हणून आहे. पाटबंधारे विभागात सेवेत असताना त्यांनी शेती सिंचनासाठी आणि कालव्याच्या पाण्यासाठी शेतकऱ्यांना केलेली मदत आजही लोकांच्या स्मरणात आहे. त्याच काळात त्यांनी जोपासलेला सामाजिक सलोखा आज निवडणुकीत त्यांच्यासाठी महत्वाची ठरत आहे.
“आम्हाला तुमची ओळख सांगायची गरज नाही, पाण्यासाठी धावून येणारा आमचा भाऊसाहेब आम्हाला पक्का ठाऊक आहे!” – अशी भावना सध्या कानगाव-लिंगाळीतील मतदार उघडपणे व्यक्त करत आहेत.
पोळ यांच्या प्रचाराची काही ठळक वैशिष्ट्ये प्रतिस्पर्ध्यांची झोप उडवणारी ठरत आहेत:
घरगुती संवाद: मोठ्या सभांच्या थाटामाटापेक्षा पोळ यांनी मतदारांच्या दारात जाऊन “आपला माणूस” म्हणून संवाद साधण्यावर भर दिला आहे.
यातून मतदारांचा वाढता पाठींबा: पोळ यांच्या पाठीशी निर्माण झालेला दिसत असताना तरुण कार्यकर्त्यांची मोठी फौज उभी आहे. व्हॉट्सअॅप आणि डिजिटल माध्यमातून त्यांचा प्रचार घराघरात पोहोचला आहे.
‘भाऊसाहेब’ या शब्द संबोध नामुळे मतदारांशी एक वेगळे भावनिक नाते तयार झाले असून, त्याचा फायदा मतदानात होण्याची दाट शक्यता आहे.
हा गट राखीव झाल्यानंतर राजकीय समीकरणे बदलली असली, तरी पोळ यांनी आपल्या जन संपर्काच्या जोरावर जाती-पातीची सर्व गणिते बाजूला सारल्याचे दिसत आहे. विकासाच्या मुद्द्यावर आणि मागील काळात केलेल्या मदतीच्या जोरावर ते निवडणुकीत उतरले आहेत. त्यामुळे इतर उमेदवारांसाठी पोळ यांचे आव्हान पेलणे सध्या तरी कठीण वाटत आहे.
निवडणुकीच्या निकालापर्यंत काहीही सांगणे घाईचे ठरेल, पण सध्याच्या वातावरणात साहेबराव पोळ यांचे पारडे जड असल्याचे जाणकारांचे मत आहे. आता प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशी नागरिक कोणाच्या पारड्यात आपले मत टाकतात, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल. मात्र, ‘भाऊसाहेब’ या नावाने सध्या कानगाव-लिंगाळी गटात मोठी आघाडी घेतली आहे हे निर्विवाद!



